आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Payal Ghosh: Latest Breaking News On Payal Ghosh Anurag Kashyap | Payal Ghosh To File FIR Against Anurag Kashyap In Mumbai Oshiwara Police Station

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोप:पायल घोष आज संध्याकाळी मुंबईच्या ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करू शकते, रवी किशन यांनी अनुरागला ‘दरिंदा’ म्हणत संसदेत प्रकरण गाजवले

मुंबई8 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • भाजपचे खासदार रवी किशन यांनी या मुद्दयाला हात घालून कठोर कायदा करण्याची मागणी केली, जेणेकरुन असे करणा-यांना कायद्याची भीती वाटेल.
 • अभिनेत्री पायल घोषचा आरोप - चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपने तिचा लैंगिक छळ करुन अभद्र भाषा वापरली.

अभिनेत्री पायल घोष तिचे वकील नितीन सातपुते यांच्यासह आज सायंकाळी मुंबईतील ओशिवरा पोलिस ठाण्यात चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात गुन्हा दाखल करू शकते. अनुराग कश्यपवर तिने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. अनुरागने एकदा न्यूड होऊन तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रय़त्न केला होता, असा दावा पायल घोषने केला आहे.

 • संसदेत गाजले पायल घोष प्रकरण

काल रात्री एक वाजेपर्यंत लोकसभेचे कामकाज सुरु होते. यावेळी गोरखपूरचे खासदार रवी किशन यांनी संसदेत अनुराग कश्यपचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी अनुराग कश्यपच्या नावाचा उल्लेख न करता त्याला 'दरिंदा' म्हटले. ते म्हणाले की, देशातील आमच्या मुली दुर्गा देवीसारख्या पूज्यनीय आहेत. पण बॉलिवूडमधील काही लोक त्यांचे नशीब नशिब उजळविण्याचा दावा करुन त्यांच्याशी सौदेबाजी करतात. रवी किशन यांनी यावेळी यासंदर्भात कडक कायदा करण्याची मागणी केली. जेणेकरुन असे कृत्य करणा-यांना कायद्याची भीती वाटेल. दोन दिवसांपूर्वीच रवी किशन यांनी अनुराग कश्यपवर गांजाचे सेवन केल्याचा आरोप केला होता.

 • अभिनेत्रीच्या आरोपांवर अनुराग कश्यपच्या वकिलांचे स्पष्टीकरण

अनुराग कश्यपने आपल्या वकिलांमार्फत एक निवेदन जारी केले आहे. अनुरागच्या वकिलांनी म्हटल्यानुसार, त्याच्यावरचे लैंगिक गैरवर्तनाचे सर्व आरोप खोटे आहेत. अनुरागने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. माझ्या वतीने माझ्या वकील प्रियांका खिमानी यांची प्रतिक्रिया, असे अनुरागने लिहिले आहे.

अनुरागच्या वकील प्रियांका खिमानी म्हणाल्या, ''माझे अशील अनुराग कश्यप यांच्यावर अलीकडे लावण्यात आलेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या खोट्या आरोपांमुळे दुःख झाले आहे. हे आरोप पूर्णपणे खोटे व निंदनीय आहेत. मीटू मोहिम स्वतःच्या स्वार्थासाठी आणि दुस-याच्या चारित्र्यहननासाठी अशाप्रकारे वापरली जातेय, हे दुर्दैवी आहे. असे खोटे आरोप मीटू मोहिमेला कमकुवत बनवतात आणि ख-या पीडितांना वेदताना देतात.''

 • काय आहेत पायल घोषचे आरोप?

अनुरागने माझा लैंगिक छळ केला, तसंच अभद्र भाषेचाही वापर केला, असा आरोप पायल घोषने केला आहे. एका मुलाखतीत पायलने तिची आपबिती कथन केली.

तिने सांगितल्यानुसार, "मी अनुराग यांना भेटायला त्यांच्या यारी रोड इथल्या ऑफिसमध्ये गेली होती. ते दुसऱ्या कुणाशी तरी बोलत होते म्हणून मी परत आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला फोन केला आणि बोलावले. काही ग्लॅमरस घालू नको असे त्यांनी सांगितले. म्हणून मी सलवार कमीज घालून त्यांना भेटायला गेले. त्यावेळी त्यांनी माझ्यासाठी जेवण बनवले, आमचे जेवण झाल्यानंतर त्यांनी माझी जेवणाची प्लेटही उचलली. त्यानंतर मी तिथून निघून आले. त्यांनी मला पुन्हा मेसेज करून बोलावले. मात्र तेव्हा खूप उशीर झाला होता म्हणून मी त्यांना भेटायला नाही येऊ शकत असे सांगितले." यानंतर दोन-तीन दिवसांनी मी अनुराग यांना पुन्हा भेटले, यावेळी मी त्यांच्या घरी गेले होते, असे पायलने सांगितले.

पायल म्हणाली, "त्यांनी मला घरी बोलावले होते. ते स्मोकिंग करत होते, मी तिथे बसले होते. त्यानंतर अनुराग यांनी मला अडल्ट फिल्म दाखवली, तेव्हा मी खूप घाबरले. अचानक ते माझ्यासमोर न्यूड झाले आणि मलादेखील माझे कपडे काढायला सांगितले. मी त्यांना म्हटले मला कन्फर्टेबल वाटत नाहीये, यावर ते मी ज्या अभिनेत्रींसह काम केले आहे, त्या फक्त एका कॉलवर माझ्याकडे येण्यासाठी तयार आहेत, असे अनुराग मला म्हणाले. मी पुन्हा त्यांना सांगितले, मला अस्वस्थ वाटतंय. काही तरी करून मी तिथून कसाबसा पळ काढला. त्यानंतर मी त्यांना कधीच भेटले नाही. त्यांनी अनेकदा मला भेटायला बोलावले. मात्र आजपर्यंत मी ती घटना विसरू शकले नाही, मला त्याचा आजही त्रास होतो", असे पायल म्हणाली.

 • म्हणून एवढी वर्षे गप्प होती पायल...

इतके दिवस गप्प राहण्याबद्दल पायल म्हणाली, "मी काय करू मला काहीच समजत नव्हते. माझ्या मित्रांनी मला सांगितले, पोलिसात तक्रार कर पण मी नाही केली. मी खूप वेळा बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र माझ्या कुटुंबाने आणि जवळच्या मित्रांनी मला गप्प राहायला सांगितले. त्यांना माझ्या भविष्याची चिंता होती. मीटू कॅम्पेन सुरू झाल्यानंतरही माझे कुटुंब, मॅनेसजरसह इंडस्ट्रीतील अनेकांनी मला गप्प राहण्यासाठी सांगितले. कारण यामुळे माझे करिअर उद्ध्वस्त होईल, अशी भीती त्यांना वाटत होती."

 • अनुराग कश्यपने आरोप फेटाळून लावले

अनुराग कश्यपने पायल घोषचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतके खोटे बोललीस की स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतले. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकंच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत”, असे ट्विट अनुराग कश्यपने केले आहे.

 • साऊथच्या अनेक चित्रपटांमध्ये झळकली आहे पायल

पायल घोषने आपल्या करिअरची सुरुवात 2009 च्या 'प्रायनम' या तेलुगू चित्रपटाद्वारे केली होती. त्यानंतर ती 2011 मध्ये 'वर्षाधारे' या कन्नड चित्रपटात दिसली. 2008 मध्ये सीन बीन स्टारर ब्रिटीश टीव्ही फिल्म 'शार्प्स पेरिल'मध्येही तिने भूमिका साकारली होती. बॉलिवूडमध्ये तिने 'पटेल की पंजाबी शादी' या चित्रपटात काम केले होते. यात तिच्यासोबत ऋषी कपूर, परेश रावल, वीर दास, प्रेम चोप्रा आणि शिल्पा शिंदे यांच्या मुख्य भूमिका होत्या.

बातम्या आणखी आहेत...