आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार केसमध्ये पायल घोषचा नवा दावा:​​​​​​​पायलने म्हटले - मी अनुराग कश्यपविषयी इरफान पठानला सांगितले होते, सर्व काही माहिती असुनही तो गप्प आहे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पायलने अनुराग कश्यपवर आरोप लावला आहे की, 2014-15 मध्ये तिच्यासोबत बळजबरीने संबंध बनवण्याचा प्रयत्न केला होता.

अनुराग कश्यपवर बलात्काराचा आरोप लावणारी पायल घोष म्हणते की, तिने फिल्ममेकरविषयी क्रिकेटर इरफान पठानला सांगितले होते. अभिनेत्रीने ट्विट केले की, 'मी इरफानला एकदम हे नव्हते सांगितले की, मिस्टर कश्यपने माझ्यावर बलात्कार केला, पण मी बोलण्याविषयी सर्व काही सांगितले होते. हे माहिती असूनही ते गप्प आहेत आणि एकेकाळी ते माझा चांगला मित्र असल्याचा दावा करायचे'

'आशा आहे की ते बोलतील'
जवळपास दोन तासानंतर एका दुसऱ्या ट्विटमध्ये पायलने इरफान पठानसोबता आपला फोटो शेअर केला. तिने लिहिले, 'इरफान पठानला टॅग करण्याचा अर्थ असा नाही की, मला त्याच्यात इंटरेस्ट आहे. पण मी ज्या लोकांना मिस्टर कश्यपविषयी शेअर केले होते, केवळ बलात्काराची गोष्ट वगळता, ते त्यामधील एक आहेत. मला माहिती आहे की, ते आपला ईमान आणि म्हाताऱ्या आई-वडिलांवर विश्वास ठेवतात. यामुळे आशा करते की, मी त्याच्यासोबत जे शेअर केले त्याविषयी ते बोलतील.'

पायलने यापूर्वी घेतले आहे ऋचा चड्ढाचे नाव
पायलने अनुराग कश्यपवर आरोप लावला आहे की, 2014-15 मध्ये तिच्यासोबत बळजबरीने संबंध बनवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी एका बातचितमध्ये दावा केला होता की, विरोध केल्यानंतर अनुरागने तिला म्हटले होते की, ऋचा चड्ढा, हुमा कुरैशी आणि माही गिलसह अनेक अभिनेत्री त्याच्यासोबत सोयीस्कर आहेत.

अनुराग कश्यपने आरोप फेटाळून लावले
22 सप्टेंबर रोजी पायल घोषने अनुरागविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. 2013 मध्ये वर्सोवामधील करी रोडवर अनुरागने बलात्कार केल्याचा तिचा आरोप आहे. 8 ऑक्टोबर रोजी या प्रकरणात अनुराग कश्यपची सुमारे 8 तास चौकशी केली गेली.

चित्रपट निर्मात्याने पोलिसांना सांगितले की पायलचे सर्व आरोप खोटे आणि निराधार आहेत. त्यांच्यात कोणतेही सत्य नाही. हा माझ्याविरूद्ध कट आहे. मात्र, पोलिसांनी त्याच्याविरूद्ध कोण आणि का कट रचला जात आहे, असे विचारले असता त्याला काहीच उत्तर देता आले नाही.

बातम्या आणखी आहेत...