आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनुराग कश्यपवर बलात्काराचा आरोप:पायल घोषने पुन्हा पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडे केली विनवणी, म्हणाली - मी अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पायल घोषने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांना ट्विट टॅग केले आहे.

चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर बलात्काराचा आरोप करणार्‍या अभिनेत्री पायल घोषने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे न्यायासाठी विनवणी केली आहे. पायलने पुन्हा एकदा ट्विट करत अनुराग कश्यपवर आरोप केले आहेत. या ट्विटमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांना टॅग केले आहे

या ट्विटमध्ये तिने म्हटले की, ‘माझ्या मित्राने आणि व्यवस्थापकाने अनुराग कश्यपला माझा चित्रपट (ओस्रावेली) संदर्भ म्हणून पहायला सांगितला होता. कारण भविष्यात आम्ही एक प्रोजेक्टवर काम करणार होतो. त्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही भेटणार देखील होतो. मात्र, अनुराग कश्यप यांनी कोणतेही सत्य विचारात न घेता माझे आणि सहकलाकार ज्युनिअर एनटीआर यांच्यातील संबंध खराब केले होते. मी अजूनही न्यायाची वाट पाहत आहे’, या आशयाचे ट्विट तिने केले आहे.

यापूर्वीही पंतप्रधानांकडे मागितली होती मदत
या आधीही पायलने एका ट्विटद्वारे पीएम मोदींकडे मदत मागितली होती. या ट्विटमध्ये तिने म्हटले होते की, ‘ही माफिया गँग माझी हत्या करेल आणि वरुन ही हत्या नसून आत्महत्या असल्याचं सिद्ध करतील’. पायलने या ट्विटमध्ये पंतप्रधान कार्यालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या रेखा शर्मा यांना टॅग केले होते.

काही दिवसांपूर्वी पायलने पोलिस स्थानकात अनुरागविरोधात बलात्कार आणि लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर अनुराग कश्यपची वर्सोवा पोलीस स्थानकात तब्बल आठ तास चौकशी झाली. यावेळी अनुरागने त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते.