आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पायल घोषची पीएम मोदींकडे मागणी:अनुराग कश्यपवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या अभिनेत्रीने लिहिले - माफिया गँग मला मारून टाकेल आणि याला आत्महत्या किंवा दुसरे काही तरी सिद्ध करेल

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पायल घोषने तिच्या एका ट्विटमध्ये रिचा चड्ढावर निशाणा साधला आहे.

चित्रपट निर्माते अनुराग कश्यपवर बलात्काराचा आरोप करणारी अभिनेत्री पायल घोषने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांची मदत मागितली आहे. तिने आपल्या ताज्या ट्विटमध्ये स्वतःच्या हत्येची शंका व्यक्त केली आहे. पायलने या दोघांना टॅग केले आणि लिहिले की, "ही मूव्ही माफिया टोळी मला ठार मारेल आणि मग ती आत्महत्या किंवा काहीतरी असल्याचे सिद्ध होईल." अनुराग कश्यपवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या अभिनेत्रीने लिहिले - 'माफिया गँग मला मारून टाकेल आणि याला आत्महत्या किंवा दुसरे काही तरी सिद्ध करेल.'

स्वतःची तुलना सुशांतसोबत केली
पायल घोषने काही तासांनंतर आणखी एक ट्विट केले आणि स्वत: ची तुलना सुशांतसिंग राजपूतशी केली. तिने पंतप्रधान कार्यालय, पीएम मोदी, गृह मंत्रालय आणि गृहमंत्री अमित शहा यांना टॅग केले आणि लिहिले, "असे दिसते की ते सुशांतप्रमाणेच माझ्या मरणाची सुद्धा वाट पाहत आहेत. कारण आतापर्यंत कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही आणि बॉलिवूडच्या इतर कलाकारांप्रमाणे मिस्ट्री बनेल."

ऋचाला विचारले - कश्यपवर एवढा विश्वास का?

पायल घोषने तिच्या एका ट्विटमध्ये रिचा चड्ढावर निशाणा साधला आहे. खरं तर, ऋचाने आपल्या एका ट्विटमध्ये रेखा शर्माशी पायल घोषची भेट झाल्याचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले होते की, "हा फोटो पाहिला रेखा शर्मा मॅम, मला माझी तक्रार (11 सप्टेंबर 2020 रोजी दाखल) केल्याचे उत्तर अद्यापही मिळालेले नाही.एका डायरेक्टरच्या प्रकरणात माझे नाव विनाकारण घेत असल्यामुळे मिस घोषणच्या विरोधात मी दाखल केली होती. तुमचे स्वतःचे ट्विट पाहत असे वाटते की, माझी तक्रार (पायल) तिच्यापहिले फाउल झाली होती.

ऋचाच्या ट्वीटला उत्तर देताना पायल घोषने लिहिले की, 'मिस चड्ढा सत्य समोर आल्याशिवायच तुम्ही असे कसे म्हणत आहात की, तुमचे नाव विनाकारण घेतले जात आहे. तुम्हाला मिस्टर कश्यपवर एवढा विश्वास का आहे? रेखा शर्मा प्लीज हे प्रकरण पाहा. पूर्ण गँग मला दाबण्याचा प्रयत्न करत आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser