आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग डील:एस.एस. राजामौलींच्या 'RRR' ची रिलीजपूर्वीच बंपर कमाई; डिजिटल आणि सॅटेलाइट हक्क विकले, नेटफ्लिक्स, झी5 सोबत झाली मोठी डील

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा चित्रपट आता इंग्रजी, कोरियन, पोर्तुगीज, तुर्की व्हर्जनमध्येही होणार रिलीज

'बाहुबली' फेम दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी आपल्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'RRR' या चित्रपटाचे डिजिटल आणि सॅटेलाइट हक्क विकले आहेत. झी, नेटफ्लिक्स आणि स्टार यांनी चित्रपटासाठी डिजिटल आणि सॅटेलाइट अधिकार विकत घेतले आहेत. याबाबतची माहिती निर्मात्यांनी स्वत: सोशल मीडियावर शेअर केली आहे.

झी 5, नेटफ्लिक्ससोबत झाली मोठी डील

  • 'आरआरआर' हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यातील तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड व्हर्जनसाठी चित्रपटाचे डिजिटल हक्क झी 5 ने खरेदी केले आहेत.
  • त्याचबरोबर हा चित्रपट इंग्रजी पोर्तुगीज, कोरियन, तुर्की, स्पॅनिश व्हर्जनमध्येही रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. या व्हर्जनचे डिजिटल हक्क नेटफ्लिक्सने विकत घेतले आहेत.
  • हिंदी व्हर्जनचे सॅटेलाइक अधिकार झी नेटवर्कने खरेदी केले आहेत.
  • स्टार इंडिया नेटवर्कने चित्रपटाच्या तेलुगू, तामिळ आणि कन्नड व्हर्जनचे सॅटेलाइट हक्क विकत घेतले आहेत.
  • तर एशियानेटला मल्याळम व्हर्जनचे सॅटेलाइट अधिकार विकण्यात आले आहेत.

झीसोबत 300 कोटीत झाली डील
रिपोर्ट्सनुसार, झी ग्रुपने 300 कोटींमध्ये 'आरआरआर'चे डिजिटल आणि सॅटेलाइट अधिकार खरेदी केले आहेत. तर स्टार नेटवर्क आणि चित्रपट निर्मात्यांनी अधिकृतपणे या कराराची आर्थिक माहिती उघड केलेली नाही. 'आरआरआर'ची ही डील भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी 'पोस्ट थिएट्रिकल' डिजिटल आणि सॅटेलाइट डील असल्याचे सांगितले जात आहे.

  • 13 ऑक्टोबर रोजी होणार प्रदर्शित

डीव्हीव्ही एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली हा चित्रपट बनवला जात आहे. हा चित्रपट 1920 च्या दशकातील क्रांतिकारक अल्लुरी सीतारामा राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित आहे. हा मल्टीस्टारर पीरियड ड्रामा यापूर्वी 8 जानेवारी 2021 रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोना आणि लॉकडाऊनमुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती.

ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण स्टारर 'आरआरआर' हा चित्रपट आता यावर्षी 13 ऑक्टोबर रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकतो. या चित्रपटात आलिया भट्ट आणि अजय देवगण हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'बाहुबली' सारखी सुपरहिट सीरिज बनवणा-या राजामौलींचा 'आरआरआर' हा चित्रपट तब्बल 450 कोटींच्या मोठ्या बजेटमध्ये तयार होत आहे.

बातम्या आणखी आहेत...