आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ पीपल अर्थातच पेटा (PETA) ने अभिनेता सोनू सूद आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांंच्या नावांची 2020 मधील भारतातील हॉटेस्ट व्हेजिटेरियन म्हणून घोषणा केली आहे. सोनू सूद PETA च्या ‘प्रो व्हेजिटेरियन प्रिंट इंडिया’ या मोहिमेत सहभागी झाला होता तसेच ‘हग अ व्हेजिटेरियन डे’ या अभिनायातही त्याने सहभाग घेतला होता.
जखमी कबुतराला दिले सोनूने जीवनदान
सोनूने सोशल मीडियावर एका आवाहनालाही प्रोत्साहन दिले होते, ज्यामध्ये मॅकडोनल्डला सांगण्यात आले होते की, त्यांनी त्यांच्या मेन्यूमध्ये मॅकवीगन बर्गरला प्राधान्य द्यावे. त्याचबरोबर त्याच्या मुलासोबत क्रिकेट खेळताना जखमी अवस्थेत सापडलेल्या एका कबुतराला त्याने जीवदानही दिले होते. दुसरीकडे PETA च्या एक पाककलेच्या पुस्तकातून प्रेरणा घेऊन श्रद्धा कपूरने नॉनव्हेज खाणे सोडून दिले होते. आता प्राण्यांच्या बाबतीत बोलण्याची एकही संधी श्रद्धा सोडत नाही.
हे दोघे जगात बदल घडवत आहेत
हे दोघे जगात बदल घडवत असल्याचे पेटाने म्हटले आहे. सोनू सूद आणि श्रद्धा कपूर जेव्हा जेवायला बसतात तेव्हा ते जगात बदल घडवायला मदत करतात. फळे किंवा भाज्या कधीही साथीच्या आजारांचे कारण बनत नाहीत. पेटा इंडिया सोनू सूद आणि श्रद्धा कपूर यांचा सन्मान करते, कारण दोघेही न्यू नॉर्मलमध्ये आपल्या चाहत्यांना शाकाहार करण्यासाठी प्रेरीत करत आहेत. त्यामुळेच त्यांना या वर्षीचा पुरस्कार देण्यात आल्याचे पेटाने म्हटले आहे.
रेखा आणि अमिताभ यांंचाही या पुरस्काराने झाला आहे गौरव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनाही पेटाने ‘हॉटेस्ट व्हेजिटेरियन’ पुरस्कारने यापूर्वीच सन्मानित केले आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, मानुषी छिल्लर, सुनील छेत्री, अनुष्का शर्मा, कार्तिक आर्यन, विद्युत जामवाल, कंगना रनोट, शाहिद कपूर आणि रेखा यांचा समावेश आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.