आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मीडिया ट्रायल:सुशांत मृत्यू प्रकरणी अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने दाखल केली याचिका; दिल्ली हायकोर्टाची केंद्र सरकार, प्रसार भारतीला नोटीस

नवी दिल्ली/मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीबीआय पथक दिल्लीत, एम्सच्या डॉक्टर्सची भेट घेतली

अभिनेता सुशांतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात ‘मीडिया ट्रायल’वर बंदीची मागणी करत अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने दिल्ली हायकाेर्टात याचिका दाखल केली आहे. हायकोर्टाने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, प्रसार भारती, न्यूज ब्राॅडकास्टर्स असाेसिएशन (एनबीए) आणि भारतीय प्रेस परिषदेला पीसीआय नाेटीस जारी करून बाजू मांडण्यास सांगितले .

रकुलने ड्रग्ज प्रकरणात आपल्याबाबत वृत्तवाहिन्यांच्या वृत्तांकनावर बंदीची मागणी केली. न्या. नवीन चावला यांचे एकेरी पीठ १५ ऑक्टोबरला सुनावणी करणार आहे. रकुल प्रीत सिंहशी बातम्यांत माध्यमे संयम ठेवतील आणि प्रसारण नियमांचे पालन करतील, अशी आशा कोर्टाने व्यक्त केली. एनसीबीच्या चौकशीत रियाने रकुल, सारा अली खान आणि इतरांची नावे घेतल्याचे वृत्त माध्यमांत झळकले होते.

सीबीआय पथक दिल्लीत, एम्सच्या डॉक्टर्सची भेट घेतली

सुशांतच्या मृत्यूची चौकशी करत असलेली सीबीआय टीम बुधवारी दिल्लीत परतली. दिल्लीत टीमने एम्सच्या फाॅरेन्सिक डाॅक्टर्सची भेट घेतली. विभागाचे प्रमुख डाॅ. सुधीर गुप्ता म्हणाले, मेडिकल बाेर्ड पुढील आठवड्यात अहवाल सादर करेल. फाॅरेन्सिक बाेर्ड पाेस्टमाॅर्टेम आणि फाॅरेन्सिकशी निगडित तांत्रिक प्रकरणांचा अहवाल देणार आहे.