आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उरल्या फक्त आठवणी:चित्रपटाच्या सेट्सवर कलाकारांसोबत सरोज खान यांची होती चांगली बाँडिंग, बघा अनसीन फोटोज

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरोज खान यांना 'मदर ऑफ डान्स' देखील म्हटले जाते.

बॉलिवूडचा दिग्गज नृत्यदिग्दर्शिका सरोज खान आता या जगात नाहीत. गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे मुंबईत निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या आणि गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. सरोज यांच्या पश्च्यात त्यांच्या कुटुंबात त्यांचे पती बी. सोहनलाल, मुलगा हमीद खान, हिना आणि सुकन्या या दोन मुली आहेत. सुमारे 40 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी दोन हजारांहून अधिक गाणी आणि शेकडो स्टार्सना कोरिओग्राफ केले. श्रीदेवी, माधुरी दीक्षित, मीनाक्षी शेषाद्री, ऐश्वर्या राय यांच्यासह अनेक अभिनेत्री त्यांच्या दिग्दर्शनाखाली थिरकल्या आणि या स्टार्सच्या यशाचे मोठे श्रेय सरोज खान यांनाही जाते. बॉलिवूड स्टार्स त्यांना मास्टरजी म्हणत असत.

22 नोव्हेंबर 1948 रोजी किशनचंद संधू सिंह आणि नोनी संधू सिंह यांच्या घरी सरोज खान यांचा जन्म झाला. त्याचे खरे नाव निर्मला होते, त्यांच्या जन्मानंतर त्यांचे कुटुंब पाकिस्तानमधून भारतात स्थायिक झाले होते.

सरोज खान यांनी वयाच्या तिस-या वर्षी 'नजराना' चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. या चित्रपटात त्या श्यामाच्या भूमिकेत दिसल्या होत्या.

आपल्या कारकिर्दीत त्यांनी 2 हजारांहून अधिक गाणी कोरिओग्राफ केली, ज्यामुळे त्यांना नृत्यदिग्दर्शनाच्या बाबतीत 'मदर ऑफ डान्स' देखील म्हटले जाते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser