आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल व्हिडिओ:मैत्रिणीच्या लग्नात आलिया भट्टची धमाल, संगीत सेरेमनीत 'जलेबी बाई', 'ससुराल गेंदा फूल'वर धरला ताल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शनिवारी पार पडलेल्या संगीत सोहळ्यातील हा व्हिडिओ आहे.

अभिनेत्री आलिया भट्ट अलीकडेच तिची बेस्ट फ्रेंड रिया खुरानाच्या लग्नात सहभागी झाली होती. जयपूरमध्ये रविवारी रिया खुराणाचा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्न सोहळ्यातील काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात आलिया खूप मस्ती करताना दिसत आहे. याच लग्नातील आलियाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. शनिवारी पार पडलेल्या संगीत सोहळ्यातील हा व्हिडिओ आहे.

या व्हिडिओमध्ये आलिया ससुराल गेंदा फूल आणि जलेबी बाई या गाण्यांवर मैत्रिणींसोबत ताल धरताना दिसत आहे.

जयपूरमध्ये रिया खुरानाचा लग्नसोहळा पार पडला.
जयपूरमध्ये रिया खुरानाचा लग्नसोहळा पार पडला.

आलियाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात आलिया गुलाबी रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.

शनिवारी पार पडलेल्या संगीत सोहळ्यात आलियाने मैत्रिणींसह धमाल केली.
शनिवारी पार पडलेल्या संगीत सोहळ्यात आलियाने मैत्रिणींसह धमाल केली.
नववधू रिया खुरानासह आलिया भट्ट. रविवारी रिया लग्नाच्या बेडीत अडकली.
नववधू रिया खुरानासह आलिया भट्ट. रविवारी रिया लग्नाच्या बेडीत अडकली.
संगीत सोहळ्यात मैत्रिणींसह धमाल करताना आलिया
संगीत सोहळ्यात मैत्रिणींसह धमाल करताना आलिया
रिया खुरानाच्या लग्नात मैत्रिणींसह सहभागी झालेली आलिया भट्ट
रिया खुरानाच्या लग्नात मैत्रिणींसह सहभागी झालेली आलिया भट्ट

रणबीरला मिस करतेय आलिया
अभिनेता रणबीर कपूरला काही दिवसांपूर्वीच करोना संसर्ग झाला आहे आणि त्यामुळे तो सध्या होम क्वारंटाइन आहे. त्यामुळे आलिया त्याला खूपच मिस करत आहे. अलीकडेच आलियाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला होता. या फोटोत या दोघांनी एकमेकांच्या हातात हात गुंफले आहेत. हा त्यांचा जुना फोटो आहे. या फोटोला तिने 'मेजर मिसिंग' असे कॅप्शन दिले होते.

बातम्या आणखी आहेत...