आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

10 छायाचित्रांमधून कंगनाचे 5:30 तास:मनालीच्या मंदिरात नतमस्तक झाल्यानंतर बहिणीसोबत मुंबईत पोहोचली कंगना, क्षणभरही डगमगू दिला नाही आत्मविश्वास

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फोटोमध्ये बघा कंगनाचा मनाली ते मुंबई पर्यंतचा प्रवास...

शाब्दिक चकमक, वार-पलटवार, वाय श्रेणीची सुरक्षा, बीएमसीकडून झालेली ऑफिसची तोडफोड... या संपूर्ण घटनाक्रमात अभिनेत्री कंगना रनोट तिने ठरवल्याप्रमाणे बुधवारी म्हणजे 9 सप्टेंबर रोजी मुंबईत दाखल झाली आहे. मुंबई विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात होती. शिवाय विरोध आणि समर्थकांची मोठी गर्दी देखील होती. दरम्यान व्हीआयपी गेटऐवजी दुस-या गेटमधून बाहेर पडत कंगना विमानतळावरून थेट आपल्या घरी दाखल झाली.

असे म्हटले जात आहे की, बीएमसीने तिला 14 दिवसांसाठी होम क्वारंटाइन केले आहे. शिवसेना, महाराष्ट्र सरकारासमोर ठामपणे उभ्या असलेल्या कंगनाचा मनाली ते मुंबईपर्यंतचा साडे पाच तासांचा प्रवास फोटोजमध्ये...

खारस्थित घरी पोचल्यानंतर कंगनाने 44 सेकंदाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. घरी पोहोचल्यावर तिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिले आहे. म्हणाली, 'आज माझे घर तुटले आहे, उद्या तुमचा अहंकार मोडेल, जय महाराष्ट्र!

कंगना विमानतळावरुन उतरत असताना तिला इंडिगोच्या वाहनातून पोलिस सुरक्षेत घरी पाठवण्यात आले. समोरच्या गेटऐवजी मागील बाजूने कडक सुरक्षेत तिला घरी पाठवण्यात आले.

मुंबई विमानतळावर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसला. शिवसेनेची कामगार सेना, रामदास आठवले यांच्या रिपब्लिक पार्टी आणि करणी सेनेचे लोक मोठ्या संख्येने मुंबई विमानतळावर हजर होते. कोविड 19 च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी यांच्याविरोधात बीएमसी कारवाई करेल की नाही हा प्रश्न आहे.

केंद्र सरकारने कंगना रनोटला वाय प्लस श्रेणीची सुरक्षा पुरविली आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसवर तिच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त ठेवला होता. पण या सर्वांचा काही उपयोग झाला नाही. मुंबई पोलिस आणि सीआरपीएफची फौजही तैनात करण्यात आली होती.

कंगनाच्या विरोधात शिवसेनेने विमानतळात आपले शेकडो कामगार जमा केले होते. दुसरीकडे कंगनाच्या समर्थनार्थ करणी सेनेच्या महिला कार्यकर्त्या देखील झेंडे-फलक घेऊन हजर होत्या. दोन्ही बाजूंनी कंगनाच्या समर्थन व विरोधात घोषणाबाजी केली गेली.

बीएमसी ऑफिसची तोडफोड केल्यानंतरचे दृश्य. कंगनाने याची तुलना पाकिस्तानसोबत केली आणि #लोकशाहीचा मृत्यू हा हॅशटॅगसह ट्विट केले.

एकीकडे बीएमसीची टीम कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड करीत असताना कंगनाने त्याच वेळी तिच्या चित्रपटाशी जोडले आणि अयोध्या आणि राम मंदिरावर ट्विट केले.

इकडे कंगना चंदीगड येथे पोचली, बीएमसीची टीम मुंबईतील तिच्या कार्यालयात पोहोचली आणि नोटीस चिकटवून तोडफोड सुरू केली. कंगनाने बाबर आणि आर्मी लिहून ही कारवाईविषयी माहिती दिली.

कंगना रनोट मनालीहून मंडी मार्गे चंडीगड विमानतळावर आली. सकाळी साडेअकरा वाजता तिला विमानतळावरच स्पेशल सिक्युरिटीत आणले गेले. बहिण रंगोली कंगनासह मुंबईला रवाना झाली.

मंडीहून चंदीगडला जाताना कंगना वाटेवर थांबली आणि हमीरपूर जिल्ह्यातील कोठी परिसरातील देवी माँच्या मंदिरात नतमस्तक झाली. इथल्या माध्यमांद्वारे तिला पुढच्या प्रवासाविषयी विचारले असता कंगना हसत हसत रवाना झाली.