आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्रीच्या भावाचे कोरोनामुळे निधन:'लाल रंग' फेम पिया बाजपेयीने भावासाठी व्हेंटिलेटरसह आयसीयू बेडसाठी मागितली होती मदत, दोन तासांनी सांगितले - दादा आता या जगात नाही

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पियाच्या भावाला रुग्णालयात व्हेंटिलेटर असलेल्या एका बेडची गरज होती.

रणदीप हूडा स्टारर 'लाल रंग' या हिंदी चित्रपटासह अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री पिया बाजपेयीच्या भावाचे कोरोनामुळे निधन झाले आहे. तिने स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली. मंगळवारी सकाळी पियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावाच्या मदतीसाठी विनंती केली होती. पण त्यानंतर दोन तासांनी तिच्या भावाच्या निधनाची बातमी आली.

पियाच्या दोन पोस्टमध्ये दिसले असहायता आणि दु:ख
मंगळवारी सकाळी 6:54 वाजता पियाने लिहिले होते, "मला जिल्हा-फर्रुखाबाद, कायमगंज ब्लॉक, उत्तर प्रदेश येथे तातडीने मदतीची गरज आहे. व्हेंटिलेटर असलेला एक बेड हवा आहे. माझा भाऊ मरणाच्या दारात उभा आहे. कृपया कुणीतरी मदत करा. जर तुम्हाला काही माहिती असेल तर आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आधीच वाईट परिस्थितीत आहोत," अशी पहिली पोस्ट पियाने शेअर केली होती.

पहिल्या पोस्टनंतर सुमारे 2 तास 19 मिनिटांनंतर पियाने आणखी एक पोस्ट लिहिली आणि तिच्या भावाच्या निधनाची माहिती दिली. सकाळी 9:13 वाजता पियाने पोस्टच्या माध्यमातून, "माझा भाऊ आता या जगात नाही," अशी माहिती दिली.

पियाने अमिताभ बच्चनसोबत केले आहे काम
27 वर्षीय पिया बाजपेयीचा जन्म उत्तर प्रदेशमधील इटावा येथे झाला. तिने रिसेप्शनिस्ट म्हणून दिल्लीत काम केले आहे. नंतर मुंबईत येऊन तिने मालिकांकरिता डबिंग आर्टिस्ट म्हणून काम केले. त्यानंतर ती बर्‍याच जाहिरातींमध्ये दिसली, त्यापैकी एका चॉकलेट ब्रँडच्या जाहिरातीसाठी तिने अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले होते. पियाने तामिळ, तेलुगू, मल्याळम, इंग्रजी आणि हिंदी भाषेसह 15 हून अधिक चित्रपटांत काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...