आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायदेशीर अडचणीत अडकला 'RRR':राजामौलींच्या 'RRR' विरोधात तेलंगणा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल, चित्रपटात इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जनहित याचिकेत चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी

साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा आगामी 'RRR' हा चित्रपट अडचणीत सापडला आहे. एकीकडे, कोरोनाचे वाढते रुग्ण आणि ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. दुसरीकडे, आता या चित्रपटाविरोधात तेलंगणा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या जनहित याचिकेत चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

चित्रपटात अनेक ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड केल्याचा आरोप
रिपोर्ट्सनुसार, ही जनहित याचिका तेलंगाणामधील पश्चिम गोदावरी येथे राहणाऱ्या सौम्या या विद्यार्थिनीने दाखल केली आहे. जनहित याचिकेत या विद्यार्थिनीने 'आरआरआर' चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचे सांगत चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती देण्याची मागणी केली आहे. या चित्रपटात दोन स्वातंत्र्य सैनिक अल्लूरी सीता रामराजू आणि कोमाराम भीम यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचे या विद्यार्थिनीने आपल्या याचिकेत म्हटले आहे.

जनहित याचिकेत चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी
या चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देऊ नये आणि तो प्रदर्शित करू नये, अशी मागणीही या विद्यार्थिनीने जनहित याचिकेत केली आहे. याप्रकरणी न्यायधीश उज्जवल भूयन आणि वैंकटे्शवर रेड्डी यांनी सुनावणी केली. आता पुढील सुनावणीची प्रतिक्षा आहे. दरम्यान याबाबत दिग्दर्शक राजामौली किंवा त्यांच्या टीमकडून कोणत्याही प्रकरची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

'RRR'ची रिलीज डेट पुढे ढकलली
एसएस राजामौली दिग्दर्शित, 'RRR' मध्ये ज्युनियर एनटीआर, राम चरण तेजा, अजय देवगण आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात ज्युनियर एनटीआर स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीता रामराजू आणि कोमाराम भीमच्या भूमिकेत राम चरण दिसणार आहेत. कोरोना आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. यापूर्वी हा चित्रपट 7 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. मात्र, निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर केलेली नाही. परिस्थिती सुधारल्यानंतरच निर्माते आता नवीन रिलीज डेटवर निर्णय घेतील, असे म्हटले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...