आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धार्थच्या ‘शेरशाह’ला पायरसीचा फटका:ऑनलाइन लीक झाला सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा आडवाणीचा 'शेरशाह',  रिलीजपुर्वीच HD मध्ये दाखवला गेला चित्रपट

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा चित्रपट एचडीमध्ये ऑनलाइन लीक झाला आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा आडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला शेरशाह हा चित्रपट 12 ऑगस्ट रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला आहे. मात्र रिलीजपूर्वीच हा चित्रपट एचडीमध्ये ऑनलाइन लीक झाला आहे. लीक झालेला चित्रपट अनेक पायरेटेड साइट्सद्वारे अपलोड करण्यात आला आहे, जिथे लोक अमेझॉन प्राइमचे सब्सक्रिप्शन न घेता हा चित्रपट पाहू शकतात. पायरसीमुळे या चित्रपटाच्या व्युअरशिपमध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून येत आहे. यूजर्स पायरेटेड साइट्सवरून सहज हा चित्रपट डाउनलोड करू शकतात.

एखाद्या मोठ्या स्टारचा चित्रपट पायरसीला बळी पडण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी, सलमान खानचा चित्रपट राधे - योर मोस्ट वाँटेड भाई, हसीना दिलरुबा, शेरनी, हंगामा 2 आणि मिली सारखे डिजिटल रिलीज झालेले चित्रपट देखील पायरसीमुळे ऑनलाइन लीक झाले आहेत.

'राधे : योर मोस्ट वाँटेड भाई' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच सलमान खानने एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना पायरसीपासून दूर रहा आणि योग्य प्लॅटफॉर्मवर चित्रपट पहा अशी विनंती केली होती. सलमान खानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांकडून कमिंटमेंट मागितली होती. तो म्हणाला होता, 'एक चित्रपट पूर्ण करण्यासाठी अनेक लोक मेहनत करतात. खूप दु:ख होतं जेव्हा लोक पायरसी करून चित्रपट पाहतात. मी तुम्हा सर्वांकडून एक कमिटमेंट मागतो की योग्य प्लॅटफॉर्मवर योग्यरित्या चित्रपट एन्जॉय करा. तर ही आहे प्रेक्षकांची कमिटमेंट.. नो पायरसी इन एंटरटेन्मेंट,' असे तो म्हणाला होता.

'राधे'च्या पायरसीनंतर उच्च न्यायालयाने घेतली होती कठोर भूमिका
'राधे'च्या चित्रपटाच्या पायरसीनंतर दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली होती. या प्रकरणातील सुनावणीदरम्यान कोर्टाने या चित्रपटाला व्हॉट्सअ‍ॅप व इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बेकायदेशीरपणे प्रसारित करण्यास बंदी घातली. इतकेच नाही तर व्हॉट्सअॅप क्रमांकावर बंदी घालण्याचे आदेश दिले होते, ज्याद्वारे चित्रपटाच्या पायरसीच्या प्रती विकल्या जात होत्या. तर, दूरसंचार कंपन्यांना अशा ग्राहकांचा खुलासा करण्यास सांगितले होते जेणेकरून त्यांच्याविरूद्ध पुढील कायदेशीर कारवाई होऊ शकेल.

अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झालेला 'शेरशाह' हा चित्रपट कारगिल वॉर हीरो कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. यात सिद्धार्थ मल्होत्राने कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली आहे. विष्णुवर्धन दिग्दर्शित हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शन आणि काश एंटरटेन्मेंटची निर्मिती आहे.

बातम्या आणखी आहेत...