आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुक:वयाच्या 80 व्या वर्षी बिग बींना काम करताना पाहून थक्क होतात पीयूष मिश्रा, म्हणाले - ते एवढी एनर्जी कुठून आणतात

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेते, लेखक आणि संगीतकार पीयूष मिश्रा यांनी अलीकडेच एका मुलाखतीत म्हणाले की, ते आता आयुष्याच्या अशा वळणावर येऊन पोहोचले आहेत जिथे ते प्रत्येक क्षणी त्यांच्या आयुष्यात काय घडणार आहे हे जाणून घेण्यास उत्सुक असतात. ते म्हणाले की, आता जगण्यासाठी माझ्याकडे 20 वर्षांपेक्षा जास्त काळ शिल्लक नाही. अशा स्थितीत त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

पीयूष म्हणाले की, मला अमिताभ बच्चन यांना विचारायचे आहे की, ते या वयातही कामासाठी एवढी एनर्जी कुठून आणतात. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते की, एका 5 वर्षांच्या मुलाने त्यांना शूटिंगदरम्यान हाच प्रश्न विचारला होता.

अमिताभ कधी थांबणार आहेत
फिल्म कम्पेनियनला दिलेल्या मुलाखतीत पीयूष यांनी सांगितले की, त्यांना नेहमीच अमिताभ बच्चन यांच्यासारखे काम करायचे होते. न थांबता काम करत राहण्यासाठी ते त्यांना नेहमीच प्रेरणा देतात. पीयूष आणि अमिताभ बच्चन यांनी 'पिंक'मध्ये एकत्र काम केले होते.

ते पुढे म्हणाले- 'तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य कामात घालवू शकत नाही. कधीकधी मी माझ्या मित्रांना पाहतो तेव्हा मला वाटते की ते स्टारडमचा पाठलाग करून थकले आहेत. ते अमिताभ बच्चन कधीच होऊ शकत नाहीत? खरं तर त्यांच्यासारखा इतर कुणीही नाही आणि वयाच्या 80 व्या वर्षीही त्यांच्याइतके वेगाने काम कोणीही करू शकत नाही.

मला अमिताभ यांना विचारायचे आहे - तुम्ही कुठे थांबणार आहात?
ते पुढे म्हणाले- 'मला त्यांना हे विचारण्याची संधी मिळाली नाही, पण मला त्यांना हे विचारायचे आहे की, ते कोणत्या गोष्टीच्या शोधात आहेत? ते कुठे थांबणार आहात? ​​​​​​इतर प्रोफेशनच्या तुलनेत कलाकार त्याला हवी तेवढी वर्षे काम करु शकतो.'

पीयूष यांनी अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान 'पिंक' हिट झाल्यानंतरचा किस्सा शेअर केला होता. एकेदिवशी ते बच्चन कुटुंबाच्या घरी आयोजित पार्टीला पोहोचला होता. तिथे त्यांनी भरपूर मद्यपान केले होते. यावेळी सर्व कलाकार मोठमोठ्या वाहनांतून घरी जात होते. तर पीयूष यांनी घरी जाण्यासाठी ऑटो बोलावला होता.

जेव्हा एका 5 वर्षाच्या मुलाने अमिताभ यांना दिला होता निवृत्तीचा सल्ला
अमिताभ यांनी काही काळापूर्वी त्यांच्या एका ब्लॉगमध्ये एक अतिशय मजेशीर किस्सा शेअर केला होता. एका मुलाने त्यांना त्याच्या आजोबांप्रमाणे निवृत्त होऊन विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी लिहिले होते- 'मी आरबीआयच्या मोहिमेसाठी शूटिंग करत होतो. एका सीनमध्ये त्यांच्यासह एक 5 वर्षांच्या लहान मुलगा होता. तो माझ्याकडे निरागसपणे वळून म्हणाला- सॉरी तुमचे वय किती आहे? मी म्हणालो - 80. तर मुलगा म्हणाला- अरे मग तुम्ही काम का करत आहात? माझे आजी आजोबा घरीच राहतात आणि चिल करतात. तुम्हीही तेच करायला हवे. त्यावर माझ्याकडे उत्तर नव्हते. या 5 वर्षांच्या मुलाचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले.'