आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाढदिवसाच्या शुभेच्छा:70 वर्षांचे झाले रजनीकांत, PM मोदींनी सोशल मीडियावर दिल्या शुभेच्छा; म्हणाले -  'देव तुम्हाला सदैव निरोगी ठेवो’

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मेगास्टार रजनीकांत यांचा आज (12 डिसेंबर) रोजी वाढदिवस आहे. त्यांनी वयाची सत्तरी पूर्ण केली आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक कलाकारापर्यंत सर्वांनीच रजनीकांत यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘प्रिय रजनीकांत तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. देव तुम्हाला सदैव निरोगी ठेवो’, असे मोदी म्हणाले आहेत.

संगीतकार ए.आर. रहमान यांनी देखीन रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'सुपरस्टार रजनीकांत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या चाहत्यांसाठी CDP रिलीज करताना अतिशय आनंद होतोय. तुम्हाला निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा', अशा शब्दांत रहमान यानी रजनीकांत यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतमधील प्रसिद्ध अभिनेता व्यंकट प्रभू रजनीकांत यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत म्हणाले, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा थलाइवा.’ तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनीही रजनीकांत यांना शुभेच्छा दिल्या.

लवकरच आगामी 'अन्नाथे' चित्रपटात झळकणार
रजनीकांत लवकरच आगामी 'अन्नाथे' या चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सिरुथाई शिवा करीत आहेत. हा चित्रपट ग्रामीण ड्रामवर आधारित असेल. या चित्रपटात चार महिला अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. कीर्ती सुरेश, नयनतारा, खुशबू सुंदर आणि मीना या चित्रपटात रजनीकांतसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसतील. या चित्रपटात प्रकाश यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तर सोरी आणि सतीशसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील.

31 डिसेंबर रोजी राजकीय पक्षाची करणार घोषणा
हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. पण कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे चित्रीकरण थांबवण्यात आले. डिसेंबरमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल आणि जानेवारीत रजनीकांत चित्रीकरणात सामील होतील. याशिवाय रजनीकांत येत्या नवीन वर्षात राजकीय कारकिर्दीची दमदार नवी सुरुवात करणार आहेत. या वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 डिसेंबरला ते आपल्या राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत. यासोबत ते म्हणाले होते की, अध्यात्मिक राजकारणाने तामिळनाडूचे भवितव्य बदलण्याची वेळ आली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser