आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायदेशीर अडचणीत 'पुष्पराज':अल्लू अर्जुनविरोधात FIR दाखल, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शैक्षणिक संस्थेच्या जाहिरातीत दिशाभूल आणि चुकीची माहिती दिल्याचा आरोप

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या आगामी 'पुष्पा: द रुल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता आलेल्या वृत्तानुसार, 'पुष्पा द राइज' या चित्रपटाने जगभरात लोकप्रिय झालेला अल्लू अर्जुन कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. रिपोर्टनुसार एका सामाजिक कार्यकर्त्याने अल्लू अर्जुनविरोधात एफआयआर दाखल केला आहे. ज्यामध्ये कार्यकर्त्याचा दावा आहे की, अल्लू अर्जुनने एका शैक्षणिक संस्थेच्या विशेष जाहिरातीत दिशाभूल करणारी आणि चुकीची माहिती दिली आहे.

वृत्तानुसार, सामाजिक कार्यकर्ते कोठा उपेंद्र रेड्डी यांनी अंबरपेट पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. ज्यामध्ये अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या कार्यकर्त्याने अल्लू अर्जुन विरुद्ध चुकीची जाहिरात केल्याप्रकरणी आणि श्री चैतन्य शैक्षणिक संस्थेविरुद्ध खोटी माहिती पसरवल्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी अल्लू अर्जुन आणि शैक्षणिक संस्थेवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी विनंती कोठा उपेंद्र रेड्डी यांनी केली आहे.

अल्लूने 6 जून रोजी संस्थेची जाहिरात प्रमोट केली होती
झाले असे की, अल्लू अर्जुनने 6 जून रोजी श्री चैतन्य शैक्षणिक संस्थेच्या एका जाहिरातीमध्ये आयआयटी आणि एनआयटीच्या रँकर्सची माहिती दिली होती. आता ही जाहिरात दिशाभूल करणारी असून समाजाला चुकीची माहिती देत ​​असल्याचा आरोप केला जात आहे. या जाहिरातीमुळे अल्लू अर्जुनवरही टीकेची झोड उठली आहे.

जाहिरातीवरुन अल्लूवर यापूर्वीही उठली टीकेची झोड
एखाद्या जाहिरातीमुळे टीकेला सामोरे जाण्याची अल्लूची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अल्लूला फूड डिलिव्हरी अॅपच्या मार्केटिंगसाठी ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. एवढेच नाही तर सरकारी ट्रान्झिट सर्व्हिसेसची माहिती चुकीची असल्याचे सांगत एका बाईक अॅपला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी अल्लूला ताकीदही देण्यात आली होती.

'पुष्पा: द राइज'च्या हिंदी व्हर्जनने केली होती 110 कोटींची कमाई
वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर अल्लू शेवटचा 'पुष्पा द राइज' मध्ये दिसला होता. सुकुमार दिग्दर्शित हा चित्रपट गेल्या वर्षी 17 डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. चित्रपटात अल्लू म्हणजेच 'पुष्पराज' व्यतिरिक्त रश्मिका मंदाना, सुनील, समंथा रुथ प्रभू, फहद फासिल, प्रकाश राज, अजय घोष यांच्यासह अनेक स्टार्स लीड रोलमध्ये दिसले होते.

हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने जवळपास 110 कोटींची कमाई केली होती. आता 'पुष्पा : द रुल' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अल्लू अर्जुन लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...