आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तांडव' सीरिजवरील वादाचा परिणाम:मुंबईत सैफ अली खान-करीना कपूर यांच्या घरांची सुरक्षा वाढवली, घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सैफ सध्या मुंबईत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

अभिनेता सैफ अली खानची अलीकडेच प्रदर्शित झालेली 'तांडव' ही वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अभिनेता झिशान आयुब याच्यावर चित्रीत एका दृश्यावर काहींनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या दृश्यामुळे हिंदू देवी-देवतांचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसंच, निर्मात्यांनी माफी मागावी अशी मागणीही जोर धरु लागली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तर दुसरीकडे याप्रकरणी लखनौत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

वेब सीरिजला वाढता विरोध बघता या मालिकेत काम करणा-या कलाकारांच्या वैयक्तिक जीवनावरही परिणाम होत आहे. हा वाद लक्षात घेता रविवारी मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणा-या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सैफ सध्या मुंबईत नसल्याचे सांगण्यात येत आहे. शूटिंगची कामे पूर्ण करण्यासाठी ते शहराबाहेर गेला आहे. तर दुस-यांदा आई होणारी करीना सध्या घरीच विश्रांती घेत आहे.

लखनौत सीरिजच्या निर्माता-दिग्दर्शकाविरोधात तक्रार
लखनौच्या हजरतगंज कोतवाली येथे अ‍ॅमेझॉन प्राइम इंडियाचे ओरिजिनल कंटेंट हेड अरुणा पुरोहित, मालिकेचे दिग्दर्शक अली अब्बास जफर, निर्माता हिमांशु कृष्ण मिश्रा आणि लेखक गौरव सोलंकी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय पोलिस उपायुक्त सोमण बर्मा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "हजरतगंज कोतवाली येथून पोलिसांची एक टीम मुंबई येथे जाईल आणि एफआयआरमध्ये ज्यांची नावे आहेत त्यांची चौकशी केली जाईल."

मुंबईत राम कदम यांची तक्रार, पोलिसांनी निर्माता-दिग्दर्शकाला बजावले समन्स

भाजपनेही या वेब सीरिजचा तीव्र विरोध केला असून राम कदम यांनी थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राम कदम यांनी घाटकोपर पोलिस ठाण्यात तांडव वेब सीरिजच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यात हिंदू देवतांचा अपमान करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले असून या वेब सीरिजचा निर्माता, दिग्दर्शक आणि यात काम करणाऱ्या कलाकारांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राम कदम यांनी केली आहे. रिपोर्टनुसार, पोलिसांनी आयटी कायद्याच्या कलम 295 ए, कलम 67 ए अंतर्गत गुन्हा दाखल केला असून निर्मात्यांना समन्स बजावले आहे.

दरम्यान, राम कदम यांनी एक ट्विटही केले आहे. त्यात त्यांनी अभिनेता सैफ अलीखानवर देखील निशाणा साधला आहे. चित्रपट आणि वेब सीरिजच्या माध्यमातून कायमच हिंदू देवी देवतांचा अपमान केला जातो. अलिकडेचं उदाहरण घ्यायचे झाले तर नवीन वेब सीरिज तांडव. सैफ अली खान पुन्हा एकदा अशाच चित्रपट, सिरीजचा भाग झाला आहे, ज्यातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी ते दृश्य हटवले पाहिजे, असे ट्विट राम कदम यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...