आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत आत्महत्या प्रकरण:मुंबई पोलिसांनी संजय लीला भन्साळींना विचारले 30 प्रश्न, म्हणाले - 'मी त्याला कुठल्याही चित्रपटातून काढून टाकले नव्हते, त्याने स्वतः माझे चित्रपट सोडले होते'

ज्योती शर्मा, मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी सोमवारी संजय लीला भन्साळी यांची सुमारे तीन तास चौकशी केली.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता संजय लीला भन्साळी यांची सोमवारी मुंबई पोलिसांनी सुमारे 3 तास चौकशी केली. या दरम्यान पोलिसांनी त्यांना सुशांतसोबतचे त्यांचे संबंध आणि चित्रपटातून काढून टाकण्याबाबतचे प्रश्न विचारले. रिपोर्ट्सनुसार पोलिसांनी त्यांना 30 हून अधिक प्रश्न विचारले.

पोलिसांनी भन्साळींना विचारले की, 'गोलियों की रासलीला: राम-लीला' आणि 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटातून काढून टाकल्यामुळे सुशांत डिप्रेशनमध्ये गेला होता आणि याविषयी तुमची त्याच्याशी काय चर्चा झाली होती. याचे उत्तर देताना भन्साळी म्हणाले की, 'मी सुशांतला कोणत्याही चित्रपटातून वगळले नाही किंवा रिप्लेसही केले नाही.'

भन्साळी पुढे म्हणाले, 'मी 2012 मध्ये 'सरस्वतीचंद्र' नावाच्या मालिकेच्या कास्टिंग दरम्यान सुशांत सिंह राजपूतला भेटलो होतो, पण त्यावेळी सुशांतला या मालिकेसाठी कास्ट करण्यात आले नव्हते. पण मी त्याच्या अभिनयाच्या कौशल्यांनी प्रभावित झालो होतो.'

पोलिस स्टेशनमध्ये जाताना संजय लीला भन्साळी
पोलिस स्टेशनमध्ये जाताना संजय लीला भन्साळी
  • 'मी दोन चित्रपटांसाठी सुशांतशी संपर्क साधला होता'

भन्साळी पुढे म्हणाले, 'मी 2013 मध्ये 'रामलीला' आणि 2015 मध्ये 'बाजीराव-मस्तानी' साठी सुशांत सिंह राजपूतशी दोनदा संपर्क साधला होता, पण त्यावेळी तो यशराज  बॅनरच्या 'पानी' या चित्रपटाच्या वर्कशॉप आणि शेड्युलमधअये व्यस्त होता.'

  • सुशांतने स्वत: चित्रपट करण्यास नकार दिला होता

ते पुढे म्हणाले, 'दिग्दर्शक म्हणून माझ्या चित्रपटासाठी मला त्याचे पूर्ण लक्ष आणि समर्पण हवे होते, पण स्वत:च्या बिझी शेड्युलमुळे स्वतः सुशांतने हे दोन्ही चित्रपट करण्यास नकार दिला होता.  त्यानंतर मी त्याच्याशी पुन्हा चित्रपटांबद्दल बोललो नाही.'

  • 'आमचे सामान्य नाते होते, तो माझा निकटवर्तीय नव्हता'

मी सुशांतला एक चित्रपट अभिनेता म्हणूनच ओळखत होतो, ज्याप्रकारे मी उर्वरित कलाकारांना ओळखतो. माझ्याबरोबर वैयक्तिक गोष्टी शेअर कराव्यात इतका तो माझ्या जवळ नव्हता. मला त्याच्या डिप्रेशनबद्दल माहिती नव्हती.

  • गेल्या चार वर्षांत केवळ तीनदा भेटलो

सुशांतसोबत झालेल्या संवादाबद्दल भन्साळी म्हणाले, '2016 नंतर मी सुशांत सिंह राजपूतला फक्त तीनदा भेटलो, तेदेखील फक्त चित्रपट कार्यक्रमांदरम्यान, पण याकाळात चित्रपट किंवा इतर कुठल्याही विषयावर माझे त्याच्याशी बोलणे झाले नव्हते.' 

  • भन्साळी यांच्या चौकशीमागचे कारण

रिपोर्ट्सनुसार, भन्साळींनी सुशांतला 'गोलियां की रासलीला: रामलीला' या चित्रपटाची ऑफर दिली होती. पण नंतर त्याच्या जागा रणवीर सिंगची वर्णी लागली. 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटाच्या बाबतीतही असेच घडल्याचे बोलले जात आहे. सुशांतला प्रथम 'बाजीराव मस्तानी'साठी संपर्क साधण्यात आला होता, पण नंतर रणवीर सिंगला मुख्य भूमिकेत घेण्यात आले होते. या दोन्ही चित्रपटाशी संबंधित पैलूंवर मुंबई पोलिस भन्साळी यांची चौकशी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • बिहारमध्ये या 8 जणांविरोधात गुन्हा दाखल

करण जोहर, आदित्य चोप्रा, साजिद नाडियाडवाला, सलमान खान, भूषण कुमार, एकता कपूर आणि दिनेश विजान, संजय लीला भन्साळी यांच्याविरोधात वकील सुधीर कुमार ओझा यांनी मुझफ्फरपूर येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हे लोक ठरवून सुशांतचे चित्रपट प्रदर्शित होऊ देत नव्हते, असा ओझा यांचा आरोप आहे. सुशांतला चित्रपट पुरस्कार सोहळे किंवा इतर कार्यक्रमांमध्ये आमंत्रित करण्यात येत नव्हते. त्याला साइडलाइन करण्यात आले होते. त्यामुळे निराश होऊन त्याने आत्महत्या केली, असा त्यांचा आरोप आहे. जर या आठ जणांवरचे हे आरोप सिद्ध झाले तर त्यांना दहा वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

  • पोस्टमॉर्टम व व्हिसेरा अहवालात आत्महत्येची पुष्टी

सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमॉर्टम व व्हिसेरा अहवालाने त्याच्या आत्महत्येची पुष्टी केली. परंतु अद्याप पोलिस तपास चालू आहे.  

  • आतापर्यंत 30 हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे

14 जून रोजी सुशांतने आत्महत्या केल्यापासून आतापर्यंत 30 हून अधिक लोकांची या प्रकरणात चौकशी झाली आहे. यामध्ये त्याचे घरातील कर्मचारी, मॅनेजर, पीआर टीम, एक्स मॅनेजर, मित्र, मैत्रिणी, सह-कलाकार आणि कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे.

यशराज फिल्म्सचे काही माजी अधिकारी आणि कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांनीही आपला जबाब नोंदवली आहे. आणखी काही अधिका-यांची चौकशी केली जाईल. शानू शर्मा यांना पुन्हा पोलिस ठाण्यात बोलावले जाऊ शकते.

याशिवाय चित्रपट निर्माते शेखर कपूर आणि अभिनेत्री कंगना रनोट यांचीही पोलिस चौकशी करू शकतात. सुशांतला बॉलिवूडच्या नेपोटिज्मचा मोठा फटका बसल्याचा आरोप कंगनाने उघडपणे केला आहे, तर शेखर कपूर यांनीही काहीसे असेच संकेत दिले होते.  

बातम्या आणखी आहेत...