आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत आत्महत्या प्रकरण:सुशांतच्या बहिणीच्या विरोधातील गुन्हा रद्द करण्यास पोलिसांचा विरोध, रिया चक्रवर्तीने प्रियांका सिंह आणि मितू सिंहविरोधात दाखल केली होती एफआयआर

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रियांका आणि मीतू यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचे गुढ अजून उलगडलेले नाही. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, सीबीआयसह ईडी आणि एनसीबी देखील या तपासात गुंतल्या आहेत. आता सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात त्याच्या बहिणी देखील अडकल्या आहेत. रिया चक्रवर्ती हिने सप्टेंबर महिन्यात सुशांतच्या दोन बहिणींविरोधात एफआयआर दाखल केला होता. हा गुन्हा रद्द व्हावा यासाठी सुशांतच्या बहिणींनी कोर्टात धाव घेतली होती. मात्र, हा गुन्हा रद्द करण्यास पोलिसांनी विरोध केला आहे.

सुशांतच्या बहिणी प्रियांका सिंह, मीतू सिंह आणि एम्सचे डॉ. तरुण कुमार यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रद्द व्हावा म्हणून त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणी मुंबई हायकोर्टात मुंबई पोलिसांनी एक प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. हे प्रतिज्ञापत्र वांद्रे पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निखिल कापसे यांनी दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्रात प्रियांका सिंह, मीतू सिंह आणि एम्सचे डॉ. तरुण कुमार यांच्या विरोधातील हा गुन्हा रद्द करू नये, असे म्हटले आहे.

रिया चक्रवर्तीचा आरोप - डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सुशांतला औषधे दिली
सुशांतची एक बहीण दिल्लीतील डॉक्टराच्या मदतीने बनावट प्रिस्क्रिप्शनच्या आधारे सुशांतला प्रतिबंधीत औषधे देत होती, ज्यामुळे सुशांतच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत होता, असा आरोप रियाने या एफआयआरमध्ये केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 7 सप्टेंबर रोजी सुशांतच्या बहिणी प्रियांका सिंह आणि मीतू सिंह या दोघींवर गुन्हा दाखल केला. रियाने दाखल केलेल्या एफआयआरची प्रत मुंबई पोलिसांनी सीबीआयकडे दिली आहे. हा गुन्हा रद्द करण्यात यावा तसेच सीबीआयने कोणतीही कारवाई करू नये अशी मागणी करत प्रियांका आणि मीतू यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.