आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:पोलिसांच्या चौकशीच्या जाळ्यात यश राज प्रॉडक्शन, व्यावसायिक बाजू तपासण्यासाठी मागितली कराराच्या सर्व कागदपत्रांची प्रत  

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिल्या हिट चित्रपटानंतर सुशांतला मोठ्या बॅनरच्या 7 चित्रपटांची ऑफर देण्यात आली होती.

अभिनेता सुुशांत सिंह राजपूतच्य  निधनानंतर पोलिस त्याच्या आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. आता आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी व्यावसायिक कोनातून शोध सुरू केला आहे. यासाठी पोलिसांनी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध प्रॉडक्शन हाऊस यशराज फिल्म्सकडून सुशांतसोबत केलेल्या कराराच्या कागदपत्रांची प्रत मागितली आहे. प्रॉडक्शन हाऊसला सुशांतबरोबर आतापर्यंत जे-जे करार केले त्या सगळ्यांच्या प्रत लवकरात लवकर पोलिसांकडे सादर करायच्या आहेत.

काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, पहिल्या हिट चित्रपटानंतर सुशांतला मोठ्या बॅनरच्या 7 चित्रपटांची ऑफर देण्यात आली होती, परंतु नंतर निर्मात्यांनी त्याला काढून रणवीर सिंग आणि इतर अभिनेत्यांना साइन केले. काही लोकांच्या मते, हेच सुशांतच्या आत्महत्येचे कारण ठरले. परंतु पोलिसांनी याची पुष्टी केली नाही. कॉन्ट्रॅक्टची कागदपत्रे पाहून पोलिसांना आर्थिक कोनातून बॉलिवूडच्या सिंडिकेट प्रकरणाची सत्यता शोधायची आहे.

सुशांतच्या निकटवर्तीयांची चौकशी सुरूच  

सुशांतचे बिझिनेस मॅनेजर श्रुती मोदी यांनी आपल्या जबाबात सांगितले की, ती जुलै 2019 ते 3 फेब्रुवारी 2020 पर्यंत त्याच्यासोबत होती आणि छिछोरे या चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही तिचा सहभाग होता. सुशांत बॉलिवूडपासून दूर जाण्याच्या तयारीत होता, त्यामुळे अनेक प्रकारच्या रिअॅलिस्टिक व्हर्च्युअल गेम्सची एक कंपनी तयार करण्याच्या तो विचारात होता.

 पर्यावरण आणि समाजाबरोबर काम करण्याची सुशांतची होती इच्छा  

याशिवाय सुशांत नेशन इंडिया फॉर वर्ल्ड या नावाने एक संस्था स्थापन करणार होता. ही संस्था महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहकार्याने पर्यावरण आणि समाजासाठी काम करणार होती. या संस्थेची नोंदणी झाली की नाही, याविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. याशिवाय सुशांतचा "जिनिअस अँड ड्रॉप आऊट्स" नावाचा एक सोशल प्रोजेक्ट होता, ज्यात समाजात नाउमेद झालेल्या परंतु अलौकिक बुद्धिमत्तेच्या लोकांसाठी एक प्रोग्राम तयार करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...