आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कलाकारांबरोबरच आता नेत्यांच्या कुटुंबातील पुढची पिढीही चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. या यादीमध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची मुलगी आरुषी निशंक हिचे नाव समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आरुषी एका वॉर चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करतेय. चित्रपटात तिच्यासह तापसी पन्नू, भूमी पेडणेकर, कीर्ति कुल्हारी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कहाणी डिफेन्सच्या सहा शूर महिला अधिका-यांवर आधारित आहे. चित्रपटात, त्या एक गुप्त ऑपरेशन चालवतात आणि शत्रू देशांच्या योजना अपयशी ठरवतात.
आरुषी म्युझिक अल्बममध्येही दिसणार आहे
आरुषी या चित्रपटापूर्वी एका म्युझिक अल्बममध्ये दिसणार आहेत. तिने स्वत: सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती दिली आहे. तिने टी सीरिजसाठी रोहित सुचांती यांच्यासह एक म्युझिक अल्बम शूट केला आहे आणि टी सीरिज लवकरच याची घोषणा करणार आहे. टी सीरिजच्या अधिका्यांनीही आरुषी लवकरच चित्रपटात झळकणार असल्याची पुष्टी केली आहे. ते म्हणाले, 'हा एक महिला केंद्रित चित्रपट असेल. आजवर पुरुष अधिका-यांच्या शौर्यावर चित्रपट बनले आहेत. महिलांच्या बाबतीत सांगायचे तर, 'राजी' हा फक्त एक चित्रपट आहे. आरुषीच्या या चित्रपटाचे शीर्षक आणि इतर तपशील हळूहळू समोर येणार आहेत.'
प्रसून जोशी यांच्या देखरेखीखाली होत आहे चित्रपटाचे काम
निशंक कुटुंबाच्या निकटवर्तीयाने सांगितले, 'प्रसून जोशी देखील या चित्रपटाशी संबंधित आहेत. ते रमेश पोख्रियाल यांचे निकटवर्तीय आहेत. अशा परिस्थितीत प्रसून त्यांच्या देखरेखीखाली या चित्रपटाचे काम पुढे जात आहे.' या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी पहिली पसंती ‘उरी’ चित्रपटाचे आदित्य धर यांना आहे आणि या चित्रपटाविषयी निर्मात्यांची त्यांच्यासोबत चर्चादेखील झाली आहे. आदित्य सध्या रॉनी स्क्रूवाला यांच्या आगामी 'अश्वत्थामा' या चित्रपटात व्यस्त आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.