आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्स ऑफिसवर डंका:ऐश्वर्या रायच्या 'पोन्नियिन सेल्वन 2' ची बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई, अवघ्या 4 दिवसांत कमावले ‘एवढे’ कोटी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन 2’ हा ऐतिहासिक चित्रपट 28 एप्रिल रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. पहिल्या भागाप्रमाणेच चित्रपटाचा दुसरा भागदेखील तिकीटबारीवर चांगली कमाई करत आहे. अवघ्या चार दिवसांतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बरेच रेकॉर्ड मोडीत काढले असून जगभरात जबरदस्त कलेक्शन केले आहे.

वर्ल्डवाइड ओलांडला 200 कोटींचा गल्ला
'पोन्नियिन सेल्वन 2'ला समीक्षकांनीही पसंतीची पावती दिली आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या काही दिवसांतच या चित्रपटाने जगभरात तब्बल 200 कोटींचा आकडा पार केला आहे. तर या चित्रपटाचा पहिला भाग 'PS 1' ने तीन दिवसांत हा माइल स्टोन गाठला होता.

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'PS 2' अवघ्या चार दिवसांतच डबल सेंच्युरी मारली आहे. चार दिवसांचे चित्रपटाचे एकुण कलेक्शन 210 कोटी झाले आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने 120 कोटींची तर परेदशात 90 कोटींची कमाई केली आहे.

'पोन्नियिन सेल्वन 2'चे भारतीय बॉक्स ऑफिस कलेक्शन
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'पोन्नियिन सेल्वन 2'ने पहिल्या दिवशी भारतात 24 कोटी आणि दुसऱ्या दिवशी 26.2 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने 30.3 कोटींचा बिझनेस केला. तर सोमवारी म्हणजेच चौथ्या दिवशी चित्रपटाची 24.52 कोटी एवढी कमाई झाली आहे. येणाऱ्या आठवड्यात हा चित्रपट 300 कोटींचाही आकडा पार करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

'पोन्नियिन सेल्वन 2'ची स्टारकास्ट
'पोन्नियिन सेल्वन 2'च्या स्टारकास्टबद्दल सांगायचे तर या चित्रपटात चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, कार्थी, तृषा कृष्णन आणि शोभिता धूलीपाला हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच जयम रवी, ऐश्वर्या लक्ष्मी, सरथकुमार, प्रभू, विक्रम प्रभू, जयराम, प्रकाश राज, पार्थिबन, रहमान, लाल, जयचित्रा आणि नासर या कलाकारांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. ए. आर. रहमान यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.