आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाहते चिंतेत:अभिनेता चियान विक्रमचा मोठा अपघात, ॲक्शन सीनच्या चित्रीकरणादरम्यान बरगडयांना जबर दुखापत

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता चियान विक्रम सध्या मणिरत्नम यांच्या 'पोन्नियिन सेल्वन 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. या चित्रपटातील विक्रमच्या भूमिकेदेखील कौतुक होत आहे. PS -2 नंतर आता विक्रमने त्याच्या आगामी थंगलान या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. मात्र आता विक्रमबद्दल एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. थंगलान या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान विक्रमचा मोठा अपघात झाला आहे आणि या अपघातात त्याला जबरदस्त मार बसला आहे. हा मार इतका जबरदस्त होता की त्याची छातीची बरगडी तुटली आहे.

विक्रमच्या मॅनेजरने दिली माहिती
विक्रमचे मॅनेजरने सूर्यनारायण यांनी एक ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे. एका ॲक्शन सीन्सच्या शूटिंगदरम्यान त्याला दुखापत झाल्याचे मॅनेजरने सांगितले. त्यामुळे चित्रपटाचे शूटिंगसुद्धा काही दिवसांकरिता थांबवण्यात आले आहे. "शूटिंगदरम्यान विक्रमला मार लागला आणि त्याची बरगडी तुटली. त्यामुळे तो काही काळासाठी थंगलानची शूटिंग करू शकत नाही," असे ट्वीट मॅनेजरने केले आहे. विक्रमची प्रकृती धोक्याबाहेर असून डॉक्टरांनी सध्या त्याला पूर्णपणे विश्रांतीचा सल्ला दिला असल्याचेही सूर्यनारायण यांनी सांगितले आहे.

‘थंगलान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन पी. रंजीत करत आहेत. या चित्रपटाची कथा 19 व्या शतकाच्या सुरुवातीला खाण क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बेतलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना कोलार सोन्याच्या खाणीशी संबंधित कथा पहायला मिळणार आहे. या चित्रपटात चियान विक्रमशिवाय मालविका मोहनन आणि पार्वती यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

विक्रम नुकताच मणिरत्नम यांच्या 'पोन्नियिन सेल्वन 2' मध्ये चौल राजकुमार आदिता करिकलनची भूमिका साकारताना दिसला. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. त्याची आणि ऐश्वर्या राय यांची जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. विक्रम आता आर.एम. विमल दिग्दर्शित 'सूर्यपुत्र महावीर कर्ण' या चित्रपटातही दिसणार आहे. हा चित्रपट 1 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होईल.

संघर्ष आणि यश:अपघातामुळे चियान विक्रमचा पाय कापण्याची आली होती वेळ, 3 वर्षांत झाल्या 23 शस्त्रक्रिया, डॉक्टरच बनली आयुष्याची जोडीदार

सुपरस्टार चियान विक्रमचा आज 58 वा वाढदिवस आहे. 'अपरिचित' (2005) या तामिळ चित्रपटातील मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरने ग्रस्त असलेल्या रामानुजमचे पात्र नक्कीच तुमच्या लक्षात असेल. ही भूमिका उत्तम प्रकारे साकारण्यासाठी विक्रमला 140 दिवस लागले होते. सलमान खानचा गाजलेला 'तेरे नाम' हा चित्रपट विक्रमच्या गाजलेल्या 'सेतू' या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. 'सेतू' या चित्रपटाने विक्रम सुपरस्टार झाला. विशेष म्हणजे 'सेतू' या चित्रपटापूर्वी विक्रमने सलग 9 वर्षे एकामागून एक फ्लॉप चित्रपट दिले होते. येथे वाचा चियान विक्रमचा संपूर्ण प्रवास...