आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामिळ गायक बंबा बाक्या यांचे निधन:वयाच्या 49 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, 'पोन्नियन सेल्वन'मध्ये गायलेले शेवटचे गाणे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळ गायक बंबा बाक्या यांचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बंबा काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर उपचारही सुरु होते. वृत्तानुसार, गुरुवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती बिघडली होती, त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

तमिळ इंडस्ट्रीसोबतच म्युझिक लेबल कंपनीनेही बंबा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
तमिळ इंडस्ट्रीसोबतच म्युझिक लेबल कंपनीनेही बंबा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

'पोन्नियन सेल्वन'मध्ये शेवटचा ऐकू येणार आवाज
1980 मध्ये जन्मलेल्या बंबा बक्‍या यांनी वयाच्या 8 व्या वर्षी गायनाला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत पुल्लिनंगल आणि सिमटांगरनसारखी अनेक हिट गाणी गायली आहेत. तामिळ इंडस्ट्रीत ते त्यांच्या बॅरिटोनसाठी ओळखले जात होते. ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान यांनी बंबा यांना ओळख मिळवून दिली. रजनीकांतच्या यांच्या 2.0 या चित्रपटातून त्यांनी बंबा यांना मोठ्या पडद्यावर लाँच केले होते. ए.आर. रहमानच्या कंपोझिशनमध्ये बंबा यांनी त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचे गाणे गायले. मणिरत्नम यांच्या मेगा बजेट 'पोन्नियन सेल्वन'मधील 'पोन्नी नधी' या गाण्यात त्यांचा आवाज ऐकायला मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...