आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादाची ठिणगी:पूजा बेदीला कुंभ मेळ्याचे आमंत्रण, मिलिंद सोमणची नागा साधूंशी तुलना करत म्हणाली होती -  नागा साधूंना तुरुंगात टाकले पाहिजे

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पूजा बेदीने एक ट्विट करत मिलिंदचे समर्थन केले होते.

अभिनेता मिलिंद सोमणच्या न्यूड फोटोची नागा साधूंसोबत तुलना करणाऱ्या अभिनेत्री पूजा बेदीचा अखिल भारतीय अखाडा परिषदेने तीव्र निषेध नोंदवला आहे. काही दिवसांपूर्वी पूजा बेदीने नागा साधूंना तुरुंगात टाकले पाहिजे, असे वादग्रस्त विधान केले होते. तिच्या या विधानाबाबत एबीएपीचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “पूजा बेदीला नागा परंपरेबाबत कोणतीही माहिती नाही. त्यामुळे पुढील वर्षी हरिद्वार येथे होणाऱ्या महाकुंभमध्ये येण्यासाठी आम्ही पूजा बेदीला आमंत्रित करणार आहोत. जेणेकरुन तिला नागा साधूंबाबत थोडंफार ज्ञान मिळेल”

महंत गिरी पुढे म्हणाले की, “नागा सन्यासींची एक परंपरा आहे, त्याची तुलना एखाद्या मॉडेल अथवा अभिनेत्याच्या नग्नतेशी अथवा अश्लीलतेशी करणे चुकीचे आहे. पूजाने काही वेळ कुंभ मेळ्यात घालवायला हवा. तिथे तिने नागा साधूंच्या कठीण तपश्चर्या पाहायला हव्यात”.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
अभिनेता मिलिंद सोमण आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने 4 नोव्हेंबरला आपल्या पत्नीसोबत गोव्यात गेला होता. येथे त्याने समुद्र किनाऱ्यावर न्यूड होऊन पळतानाचा एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता. फोटोपोस्ट करत त्याला ‘हॅपी बर्थडे टू मी’ असे कॅप्शन दिले होते. फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली होती.

याप्रकरणी मिलिंदविरोधात गोव्यातील वास्को पोलिस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला. त्याच्या फोटोशूटवर गोवा सुरक्षा मंचने आक्षेप नोंदवत तक्रार नोंदवली. गोवा सुरक्षा मंचने सोमण यांनी न्यूड फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्यामुळे गोव्याची प्रतिमा आणि संस्कृतीचा अपमान होत असल्याचे आपल्या तक्रारीत म्हटले.

यावर पूजा बेदीने मात्र मिलिंदची पाठराखण केली. तिने एक ट्विट करत मिलिंदचे समर्थन केले. ट्विटमध्ये ती म्हणाली, “मिलिंद सोमणच्या या फोटोमध्ये कोणत्याही प्रकारची अश्लीलता नाही. अश्लीलता ही पाहणाऱ्याच्या नजरेत असते. नग्नता एक अपराध असेल तर सर्व नागा बाबा लोकांना तुरुंगात टाकले पाहिजे. केवळ शरीरावर राख रगडणे स्वीकारार्ह होणार नाही”, असे मत तिने व्यक्त केले होते.

बातम्या आणखी आहेत...