आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाहिरातीवरुन वाद:'दिल बेचारा' फेम संजना सांघीने जाहिरातीत मुलाला लगावली आठ वेळा कानशिलात, पूजा बेदीने घेतला आक्षेप

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुरुषांवरील घरगुती हिंसाचाराचा प्रचार केल्याचा आरोप जाहिरातीवर आहे.

'दिल बेचारा' फेम अभिनेत्री संजना सांघीने एका जाहिरातीत काम केले आहे. मात्र तिची ही जाहिरात वादाच्या भोव-यात सापडली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मला प्रोत्साहन देण्यासाठी ही जाहिरात केली गेली आहे. पुरुषांवरील घरगुती हिंसाचाराचा प्रचार केल्याचा आरोप जाहिरातीवर आहे.

का भडकली पूजा बेदी
पूजा बेदीने या जाहिरातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यावर आक्षेप घेतला आहे. तिने लिहिले की, ‘ही जाहिरात पाहताना मला आश्चर्य वाटले. पुरुषांवरील घरगुती हिंसाचार मान्य केला जाणार नाही. जर जाहिरातीमध्ये एक पुरुष माहिलेला मारत असेल तर?’ अशा आशयाची पोस्ट पूजा बेदीने केली आहे.

जाहिरात काय दाखवले गेले?

लायन्सगेट प्ले शोची ही जाहिरात आहे. या जाहिरातीच्या व्हिडिओत संजना सांघी आपल्या पार्टनरसह बेडवर बसली आहे. दोघांनी कोणता शो पहावा हे त्यांच्यात ठरत नसते. तेव्हा संजना त्या मुलाला आठ वेळा कानाखाली मारते आणि आता त्याने आठ शो बघावे, असे त्याला सांगते.

सोशल मीडिया यूजर्सनी घेतला जाहिरावर आक्षेप
या जाहिरातीवर सोशल मीडियावरुनही बरीच टीका होत आहे. पुरुषांवरचा अत्याचार सहन केला जाणार नाही, असा एकंदरीत सूर सोशल मीडियावर उमटू लागला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser