आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूजा भट्टचा वाढदिवस:अभिनेत्रीच्या आयुष्याला आहे वादाची किनार, वयाच्या 16 व्या वर्षापासून दारुच्या आहारी गेली आणि पोहोचली होती मरणाच्या दारात

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वयाच्या 16 व्या वर्षापासून दारुच्या आहारी गेली होती पूजा, आता पूजा दारुच्या थेंबालाही स्पर्श करत नाही.

अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका पूजा भट्ट 50 वर्षांची झाली आहे. पूजा भट्टच्या खासगी आयुष्याला वादाची किनार आहे. तिने डॅडी (1989) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिचे वडील महेश भट्ट यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यावेळी पूजा फक्त 17 वर्षांची होती. या चित्रपटात तिला अतिशय बोल्ड अंदाजात सादर करण्यात आले होते. या चित्रपटातील भूमिकेसाठी पूजाला फिल्मफेअरचा न्यू फेस ऑफ द इयरचा पुरस्कार मिळाला होता.

बालपणी किरणसोबत पूजा
बालपणी किरणसोबत पूजा

'सडक'मध्ये काम करताना होती नर्व्हस
एका मुलाखतीत पूजाने तिच्या पहिल्या किसिंग सीनमागची कथा सांगितली होती. त्यावेळी तिचे वडील महेश भट्ट यांनी तिला एक सल्ला दिला होता. पूजाने हा किसींग सीन तिच्या करिअरमधील तिसरा चित्रपट 'सडक' (1991) मध्ये दिला होता, ज्यामध्ये संजय दत्त मुख्य भूमिकेत होता. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते महेश भट्ट होते.

पूजाने सांगितले होते, 'मी 18 वर्षांची होते, जेव्हा मला माझा आयकॉन संजय दत्तसोबत किसिंग सीन द्यायचा होता. ज्या व्यक्तीचे पोस्टर माझ्या खोलीत होते त्या व्यक्तीचे मला चुंबन घ्यायचे होते. मला आठवते की, पप्पांनी त्यावेळी मला जे सांगितले होते, ते मला आयुष्यभर लक्षात राहिले. ते म्हणाले होते- पूजा तुला जर ते वल्गर वाटत असेल तर ते वल्गरच होईल. म्हणूनच तुला किसींग किंवा लव्ह मेकिंग सीनकडे निरागसतेने, ग्रेस आणि सन्मानाने पाहण्याची गरज आहे.'

आई किरण, भाऊ राहुल आणि वडील महेश भट्टसोबत पूजा
आई किरण, भाऊ राहुल आणि वडील महेश भट्टसोबत पूजा

वयाच्या 16 व्या वर्षापासून दारुच्या आहारी गेली होती पूजा
पूजाने वयाच्या 16 व्या वर्षापासूनच दारु पिण्यास सुरुवात केली होती. हळूहळू ती दारुच्या आहारी गेली. आणि तिला हे व्यसनच जडले. मात्र दारु पिणे सोडले नाही तर जास्त दिवस आपण जगू शकणार नाही, हे तिला वयाच्या 45 व्या वर्षी समजले. आपण मृत्यूच्या दाढेत पोहोचलोय, असे पूजाला वाटू लागले होते.

आता पूजा दारुच्या थेंबालाही स्पर्श करत नाही.
पूजाने 24 डिसेंबर 2016 रोजी दारु पिणार नसल्याची शपथ घेतली होती. आणि त्याला आता सहा वर्षे झाली आहेत. तिने दारूच्या बाटलीला स्पर्शही केला नाही. पूजाने एका मुलाखतीत तिच्या दारूच्या व्यसनाबद्दल खुलेपणाने सांगितले होते. पूजाने मुलाखतीत सांगितले होते की, 'आम्ही अनेक गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करतो, पण जेव्हा मी दारु सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याबद्दल उघडपणे बोलण्याचा विचारही केला.

मी माझ्या फिल्मी करिअरची सुरुवात 'डॅडी' या चित्रपटातून केली होती, हा चित्रपट एका मुलीवर होता, जिला आपल्या वडिलांना दारुच्या व्यसनापासून वाचवायचे आहे. चार वर्षांपूर्वी मलाही असाच त्रास होत होता. हे सर्व कुणासोबतही होऊ शकते, हे मी लोकांशी बोलून त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. या सर्व गोष्टींवर महिलांनी अधिक मोकळेपणाने बोलण्याची गरज आहे. त्यावेळी मला लोकांकडून मिळालेल्या प्रतिसादात अशा काही लोकांचा समावेश होता ज्यांना मी ओळखत नव्हते पण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून मला आनंद झाला.

वडिलांमुळे चुक आली लक्षात

पूजाचे वडील महेश भट्ट आणि कॅबरे दिग्दर्शक कौस्तुवा यांच्या पाठिंब्यामुळे पूजाला दारुसारख्या वाईट व्यसनावर विजय मिळवता आला. महेश भट्ट यांच्यामुळे पूजाला तिची चुक लक्षात आली. महेश भट्ट पूजाला म्हणाले होते- जर तू माझ्यावर प्रेम करतेस तर स्वत:वरही प्रेम कर, कारण मी तुझ्यामध्ये स्वत:ला बघतो. वडिलांचे हेच शब्द पूजाला निरोगी आयुष्य जगण्यास प्रेरणा देणारे ठरले.

पूजा भट्ट आणि महेश भट्ट
पूजा भट्ट आणि महेश भट्ट

दारुमुळे पूजाने गमावला आपला मित्र

वृत्तानुसार दारुच्या व्यसनामुळे महेश भट्ट यांचा पहिले लग्न तुटले होते. त्यामुळे दारुने आयुष्य उद्धवस्त होऊ शकतं याची जाणीव पूजा आहे. एकेकाळी महेश भट्ट यांनाही दारुचे व्यसन होते. त्यामुळेच पूजाची आई किरण भट्ट त्यांच्यापासून विभक्त झाली होती. दारुमुळेच पूजाने आपल्या 40 वर्षीय एका फ्रेंडला गमावले होते. मित्राच्या निधनानंतर पूजा आणखी दारु प्यायला लागली होती. मात्र, आता पूजा या व्यसनातून पूर्णपणे मुक्त झाली आहे. तिच्या घरात बार आहे, परंतु आता ते केवळ मित्र आणि पाहुण्यांसाठी आहे. पूजाने 2003 मध्ये मनीष मखिजासोबत लग्न केले होते. पण 2014 मध्ये ते वेगळे झाले असले तरी अद्याप त्यांचा घटस्फोट झालेला नाही.

पूजाने केले होते कमबॅक
50 वर्षीय पूजाने दीर्घकाळाने सिल्व्हर स्क्रिनवर कमबॅक केले होते. गेल्यावर्षी आलेल्या 'बॉम्बे बेगम' या वेब सीरिजमध्ये ती दिसली होती. पूजाने तिच्या फिल्मी करिअरमध्ये 'सडक', 'जानम', 'गुनहगार', 'हम दोनों', 'अंगरक्षक', 'चाहत', 'तमन्ना', 'बॉर्डर', 'जख्म' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

'बॉम्बे बेगम्स'मध्ये पूजा भट्ट
'बॉम्बे बेगम्स'मध्ये पूजा भट्ट

'जिस्म'ची निर्माती होती पूजा भट्ट

पूजाने तिच्या अभिनय कारकिर्दीनंतर निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. तिने 'सूर', 'जिस्म', 'पाप', 'रोग' असे अनेक चित्रपट केले आहेत. विशेषतः तिचा 'जिस्म' हा चित्रपट खूप गाजला होता. ती 'जिस्म' या चित्रपटाची निर्मातीही होती. हा चित्रपट खूपच बोल्ड होता आणि त्याचे संगीतही चाहत्यांना आवडले होते.

बातम्या आणखी आहेत...