आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

49 वर्षांची झाली पूजा भट्ट:दारूच्या व्यसनामुळे मरणाच्या दारात पोहोचली होती पूजा भट्ट, वडिलांमुळे आयुष्यभरासाठी सोडले मद्यपान

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनयासह पूजाने दिग्दर्शनात आजमावला हात

अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका पूजा भट्ट 49 वर्षांची झाली आहे. पूजा भट्टच्या खासगी आयुष्याला वादाची किनार आहे. तिने डॅडी (1989) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिचे वडील महेश भट्ट यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यावेळी पूजा फक्त 17 वर्षांची होती. या चित्रपटात तिला अतिशय बोल्ड अंदाजात सादर करण्यात आले होते. या चित्रपटातील भूमिकेसाठी पूजाला फिल्मफेअरचा न्यू फेस ऑफ द इयरचा पुरस्कार मिळाला होता.

वयाच्या 16 व्या वर्षापासून दारुच्या आहारी गेली होती पूजा
पूजाने वयाच्या 16 व्या वर्षापासूनच दारु पिण्यास सुरुवात केली होती. हळूहळू ती दारुच्या आहारी गेली. आणि तिला हे व्यसनच जडले. मात्र दारु पिणे सोडले नाही तर जास्त दिवस आपण जगू शकणार नाही, हे तिला वयाच्या 45 व्या वर्षी समजले. आपण मृत्यूच्या दाढेत पोहोचलोय, असे पूजाला वाटू लागले होते.
आता दारुला स्पर्शही करत नाही पूजा

आता पूजा दारुच्या थेंबालाही स्पर्श करत नाही.
पूजाने 24 डिसेंबर 2016 रोजी दारु पिणार नसल्याची शपथ घेतली होती. आणि त्याला आता चार वर्षे झाली आहेत. तिने दारूच्या बाटलीला स्पर्शही केला नाही.

वडिलांमुळे चुक आली लक्षात

पूजाचे वडील महेश भट्ट आणि कॅबरे दिग्दर्शक कौस्तुवा यांच्या पाठिंब्यामुळे पूजाला दारुसारख्या वाईट व्यसनावर विजय मिळवता आला. महेश भट्ट यांच्यामुळे पूजाला तिची चुक लक्षात आली. महेश भट्ट पूजाला म्हणाले होते- जर तू माझ्यावर प्रेम करतेस तर स्वत:वरही प्रेम कर, कारण मी तुझ्यामध्ये स्वत:ला बघतो. वडिलांचे हेच शब्द पूजाला निरोगी आयुष्य जगण्यास प्रेरणा देणारे ठरले.

दारुमुळे पूजाने गमावला आपला मित्र

वृत्तानुसार दारुच्या व्यसनामुळे महेश भट्ट यांचा पहिले लग्न तुटले होते. त्यामुळे दारुने आयुष्य उद्धवस्त होऊ शकतं याची जाणीव पूजा आहे. एकेकाळी महेश भट्ट यांनाही दारुचे व्यसन होते. त्यामुळेच पूजाची आई किरण भट्ट त्यांच्यापासून विभक्त झाली होती. दारुमुळेच पूजाने आपल्या 40 वर्षीय एका फ्रेंडला गमावले होते. मित्राच्या निधनानंतर पूजा आणखी दारु प्यायला लागली होती.

मात्र, आता पूजा या व्यसनातून पूर्णपणे मुक्त झाली आहे. तिच्या घरात बार आहे, परंतु आता ते केवळ मित्र आणि पाहुण्यांसाठी आहे.

अभिनयासह पूजाने दिग्दर्शनात आजमावला हात

1991 मध्ये आलेला 'दिल है की मानता नहीं' हा चित्रपट तिच्या कारकिर्दीतला सर्वात मोठा हिट चित्रपट होता. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतूक झाले होते. याशिवाय 1991 मध्ये आलेला संजय दत्त सोबतचा 'सडक' चित्रपटही खूप गाजला होता. पूजाचा अखेरचा चित्रपट 2001 मध्ये रिलीज झालेला 'एव्हरीबडी सेज आय एम फाइन' हा होता. 2004 मध्ये तिने 'पाप' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. 1996 मध्ये तिने पूजा भट्ट प्रॉडक्शन कंपनी सुरू केली आणि त्याअंतर्गत 'तमन्ना' हा चित्रपट रिलीज झाला होता.

बातम्या आणखी आहेत...