आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टिकटॉक कॉन्ट्रोव्हर्सी:अ‍ॅसिड हल्ल्याला प्रोत्साहन देणार्‍या टिकटॉकरवर पूजा भट्ट संतापली, ट्विट करुन सुनावले खडे बोल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फैजलचा हा व्हिडीओ दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टिक-टॉकर फैजल सिद्दीकीचे व्हिडीओ टिक-टॉक अ‍ॅपवर नेहमीच व्हायरल होतात. अलीकडेच फैजल आपल्या व्हिडीओमध्ये अ‍ॅसिड फेकण्याचा अभिनय करत आहे. त्यामुळे तो वादात सापडला आहे. हा व्हिडीओ पाहून अभिनेत्री पूजा भट्ट चांगलीच संतापली आहे. अशा प्रकारचे व्हिडीओ तयार करण्याची संमती कोण देतो? असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.  

फैजलचा हा व्हिडीओ दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर पूजा भट्टने हा व्हिडीओ रिट्विट करत ट्विटरवर फैजलला खडे बोल सुनावले आहे. “या लोकांची समस्या काय आहे? ही अत्यंत चुकीची कृती आहे. टिक-टॉक इंडिया तुम्ही अशा प्रकारचे व्हिडीओ तयार करण्याची संमती कशी काय देता? या व्यक्तिला कामावर पाठवण्याची गरज आहे. या व्हिडीओमधील तरुणीला कळतंय की तिने कुठल्या प्रवृत्तीला पाठिंबा दिला आहे.” अशा आशयाचे ट्विट पूजाने केले आहे.

वास्तविक व्हिडीओमध्ये, एकतर्फी प्रेमाचे संवाद डब करताना फैजलने मुलीवर अ‍ॅसिड फेकण्याचा अभिनय केला आहे. तेव्हापासून या व्हिडीओला सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहे. या प्रकरणात, राष्ट्रीय महिला आयोगाने देखील टिक-टॉकरचे अकाऊंट निलंबित करण्याची मागणी केली आहे. तर अनेक यूजर्सनीही यावर आपला संताप व्यक्त केला आहे. 

फैजल सिद्दीकीने दिले स्पष्टीकरण

  हा व्हिडीओ महिनाभरापूर्वीचा आहे, जो फैजल सिद्दीकीच्या टिक-टॉक अकाऊंटवरुन पोस्ट केला गेला आहे. या प्रकरणावर फैजलने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिले आहे. त्याने लिहिले- मी व्हिडिओ हटविला आहे आणि मी कोणत्याही प्रकारे अ‍ॅसिड हल्ल्याला प्रोत्साहन देत नाही. व्हिडीओमध्येही मी फक्त पाणी वापरत आहे जे मी पीत आहे.

बातम्या आणखी आहेत...