आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तयारी:'कुली नं. 1'  आणि 'बेल बॉटम'चे निर्माते म्हणाले - लॉकडाऊननंतरही मास्क लावणे -सोशल डिस्टंसिंगसारखे नियम पाळले जातील 

मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आम्ही चित्रपटांसाठी क्लोज डोअर स्टुडिओच्या शोधात आहोत, असे निर्माता जॅकी भगनानीने सांगितले.

कोरोनाव्हायरसमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टीतील काम बंद आहे. सर्व लोक या साथीच्या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजनांचे पालन करत आहेत. लॉकडाऊननंतरही या सुरक्षा उपायांना सुरू ठेवण्यासाठी इंडस्ट्रीतील लोक सज्ज आहेत. वासु भगनानी यांची निर्मिती कंपनी पूजा एंटरटेन्मेंटनेही त्यांच्यासाठी सुरक्षितता प्रथम असल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.  या बॅनरअंतर्गत वरुण धवन-सारा अली खान स्टारर 'कुली नं. 1' आणि अक्षय कुमार स्टारर ‘बेल बॉटम’ या चित्रपटांची निर्मिती होत आहे.

कंपनीच्या अधिकृत निवेदनात असे लिहिले आहे की, "लॉकडाऊन उठल्यानंतरही पूजा एंटरटेन्मेंट सर्व चित्रपट निर्मिती प्रक्रियेत उच्च पातळीवरील सुरक्षा आणि आरोग्याच्या मानदंडांची तयारी सुरू ठेवत आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. त्याचबरोबर, काम पुन्हा सुरु करण्याची परवानगी मिळाल्यानंतरही सरकार आणि आरोग्य एजन्सींनी ठरविलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे सर्वांनी अनुसरण करण्यात येईल."

निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, "प्रत्येक डिपार्टमेंटमधील स्वच्छता आणि सोशल डिस्टंसिंगसाठी सर्व प्रकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात येईल. पूजा एंटरटेन्मेंट काही मूलभूत नियमांचा विचार करीत आहे. यात क्लोज डोअर स्टुडिओ, शूटिंगसाठी पोर्टेबल एसीसोबत मोठे तंबू, सेटवर मर्यादित लोक, सर्व सामान्य क्षेत्राची स्वच्छता, संपूर्ण कर्मचार्‍यांसाठी मास्क आणि ग्लव्स आवश्यक, सर्व उपकरणांचे सतत निर्जंतुकीकरण, इतर गोष्टींसह सेटवर संपूर्ण वेळ मेडिकल असिस्टंटची उपस्थिती याचा यात समावेश आहे. कलाकार आणि क्रूमधील प्रत्येक सदस्य आमचे कुटुंब आहे."

'लॉकडाऊनने मानवी जीवनाचे महत्त्व शिकविले'

वासु भगनानी यांचा मुलगा आणि निर्माता जॅकी भगनानी एका बातचीतमध्ये म्हणाला, "लॉकडाऊनने एक गोष्ट शिकविली आहे आणि ती म्हणजे मानवी जीवन आणि आपल्या आरोग्याचे महत्त्व. सेटवरील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतली जाईल. आम्ही चित्रपटांसाठी क्लोज डोअर स्टुडिओच्या शोधात आहोत, जे लॉकडाऊन हटल्यानंतर फ्लोअरवर येतील.  परदेशात असे सेट्स उपलब्ध आहेत आणि ते भारतातही तयार करता येतील का ते पाहावे लागेल."

लॉकडाऊन हटताच सुरु होईल 'बेल बॉटम'चे चित्रीकरण

डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शित केलेला आणि वरुण धवन आणि सारा अली खान स्टारर 'कुली नंबर. 1' प्रदर्शनासाठी तयार आहे. लॉकडाऊन उघडताच तो रिलीज केला जाईल. तर अक्षय कुमार स्टारर आणि रणजित तिवारी दिग्दर्शित ‘बेल बॉटम’ चित्रपटाची शूटिंग सुरू करण्याची तयारी करत आहे.