आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लकी राहील 2021 हे वर्ष:बॅक-टू-बॅक चार मोठ्या चित्रपटांत दिसणार पूजा हेगडे, सलमान खान, रणवीर सिंह आणि प्रभाससोबत शेअर करणार स्क्रिन

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पूजा म्हणाली, माझे हे वर्ष खूपच चांगले जाणार आहे, असे मला वाटते.

अभिनेत्री पूजा हेगडेसाठी हा काळ खूपच यशस्वी ठरणार आहे. यावर्षी तिचे चार मोठे चित्रपट येणार आहेत. यापैकी एक सलमान खान, दुसरा रणवीर सिंह, तिसरा अखिल अक्किनेनीसेाबत आहेत, तर चौथा चित्रपट ती प्रभाससोबत शूट करत आहे.

चार चित्रपटांच्या बिझी शेड्यूलविषयी ती सांगते, 'मी सेटवर काम करतच नवीन वर्षात प्रवेश केला, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. मी 3 जानेवारीपासून ‘राधेश्याम’साठी पुढचे शूट सुरू केले आहे. आता मी पुढे ‘सर्कस’चे शूटिंग सुरू करणार आहे. त्यामुळे दोन्हीमध्ये थोडाही ब्रेक न घेता लागोपाठ शूटिंग सुरू आहे. माझे हे वर्ष खूपच चांगले जाणार आहे, असे मला वाटते,' असे पूजा म्हणाली.

पुढे ती म्हणते, '2021 ची यापेक्षा चांगली सुरुवात काय असू शकते. आज माझ्या हातात चार चित्रपट आहेत. मी सतत काम करत आहे आणि तेच मला आवडते. नवीन वर्षे असे माझ्यासाठी खूप मोठे काम घेऊन येऊ, हीच प्रार्थना करते. 2021 मध्ये आणखी काय काय होते ते पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.'

पूजा नागार्जुनचा मुलगा अखिल अक्किनेनीसोबत ‘मोस्ट अॅलिजिबल बॅचलर’मध्ये दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...