आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सोशल मीडिया:पूजा हेगडेचे इंस्टाग्राम अकाऊंट झाले हॅक, अवघ्या तासाभरात टेक्निकल टीमच्या मदतीने झाली अकाऊंट रिकव्हरी 

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पूजाने आपल्या टेक्निकल टीमचे आभार व्यक्त केले आहेत.
Advertisement
Advertisement

'हाऊसफुल 4' फेम अभिनेत्री पूजा हेगडे सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. अभिनेत्री सतत तिची लॉकडाउन डायरी शेअर करत असते. दरम्यान, तिने तिचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याची माहिती चाहत्यांना दिली. मात्र, टेक्निकल टीमच्या मदतीने अकाऊंटची रिकव्हरी झाल्याचे तिने सांगितले.

गुरुवारी सकाळी पूजाने तिच्या ट्विटर हँडलवरून लिहिले, 'नमस्कार मित्रांनो. माझ्या टीमने मला सांगितले आहे की, माझे इंस्टा अकाऊंट हॅक झाले आहे. माझी डिजिटल टीम मला यात मदत करीत आहे. कृपया यातून कोणतेही आमंत्रण स्वीकारू नका किंवा वैयक्तिक माहिती देऊ नका. धन्यवाद.

यानंतर अर्ध्या तासाने पूजाने आपल्या टेक्निकल टीमचे आभार व्यक्त करुन अकाऊंट रिकव्हर झाल्याचे सांगितले. तिन ट्विट केले, 'इंस्टाग्राम अकाऊंटच्या सेफ्टीबद्दल मला काळजी वाटत होती. माझ्या टेक्निकल टीमने  त्वरित मदत केल्याबद्दल धन्यवाद. अखेरीस माझे अकाऊंट परत मिळाले आहे. गेल्या तासाभरात माझ्या अकाऊटंवर करण्यात आलेलेल्या पोस्ट आणि मेसेज हटविले जातील.'

लॉकडाऊनमुळे काम थांबले

पूजा हेगडे लवकरच प्रभाससमवेत 'जान' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची शूटिंग जॉर्जियामध्ये सुरू होती, मात्र लॉकडाऊनमुळे ती बंद झाली आहे. पूजा हेगडेने तिचे बरेचसे भाग शूट केले आहेत पण चित्रपटाची बरीच शूटिंग बाकी आहे.

Advertisement
0