आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अश्लील व्हिडिओ शूट प्रकरणी पूनम पांडेला दिलासा:पूनम आणि तिचा पती सॅम बॉम्बेला जामीन मंजुर, अश्लील व्हिडिओप्रकरणी गोवा पोलिसात दाखल झाली होती तक्रार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मिळाला आहे.

गोव्यातील चापोली धरणावर अश्लील व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी अभिनेत्री पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे यांना गुरुवारी पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात आता पूनम आणि सॅम यांना जामीन मिळाला आहे. प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मिळाला आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. दरम्यान हा व्हिडिओ शूट केला जात असताना तिथे उपस्थित असलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. शिवाय अश्लील व्हिडिओ शूट करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूनमने जिथे व्हिडिओ शूट केला होता ते धरण पाटबंधारे खात्याच्या नियंत्रणाखाली आहे. स्थानिक विरोधी पक्ष गोवा फॉरवर्डने केलेल्या तक्रारीवरून हा एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक (दक्षिण गोवा) पंकज सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 294 ((अश्लीलता) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

गोवा फॉरवर्ड पक्षाने अश्लील व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी पूनम पांडे विरोधात पोलिस तक्रार केली. गोव्यात पूनमने काणकोण येथील चापोली धरणावर एक मादक व्हिडिओ शूट केला होता. हे धरण पाटबंधारे खात्याच्या नियंत्रणाखाली आहे. या पार्श्वभूमीवर व्हिडिओबाबत गोवा फॉरवर्ड पक्षाने संताप व्यक्त केला आहे. भाजपा गोव्याला पॉर्न डेस्टिनेशन करु पाहतेय का? असा सवाल करत त्यांनी पूनमवर जोरदार टीका केली.

गोवा फॉरवर्ड महिला शाखेच्या अध्यक्षा अश्मा सय्यद यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे केली. "आधीच गोव्याला पार्टी डेस्टिनेशन व ड्रग्ज डेस्टिनेशन म्हटले जाते. आता या राज्याची ओळख पॉर्न डेस्टिनेशन करायची आहे का?" अशा शब्दात त्यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला.