आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अश्लील व्हिडिओ शूट करणे पडले महागात:पूनम पांडेला गोवा पोलिसांकडून अटक, सेमी न्यूड होऊन शूट केला होता व्हिडिओ; घटनास्थळी उपस्थित असलेले दोन पोलिस कर्मचारीही निलंबित

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पूनम पांडे हिला काणकोण पोलिसांनी अगुआडा येथील एका रिसॉर्टमधून अटक केली आहे. यावेळी तिचा नवरा सॅम बॉम्बे तिच्यासोबत आहे.

गोवा पोलिसांनी गुरुवारी काणकोण येथील चापोली धरणावर अश्लील व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी अभिनेत्री पूनम पांडे हिला अटक केली आहे. थोड्याच वेळात तिला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात येईल. व्हिडिओच्या शूटिंग दरम्यान पूनम पांडेजवळ उभे असलेल्या दोन पोलिस कर्मचार्‍यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

ताज्या माहितीनुसार, अभिनेत्रीला काणकोण पोलिसांनी अगुआडा येथील एका रिसॉर्टमधून अटक केली आहे. या प्रकरणात अश्लील फोटो शूट करणार्‍या अज्ञात व्यक्तीवरही गुन्हा दाखल आहे.

पूनमने जिथे व्हिडिओ शूट केला ते धरण पाटबंधारे खात्याच्या नियंत्रणाखाली आहे. स्थानिक विरोधी पक्ष गोवा फॉरवर्डने केलेल्या तक्रारीवरून हा एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक (दक्षिण गोवा) पंकज सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 294 ((अश्लीलता) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूनम पांडेविरोधातील तक्रारीत काय म्हटले आहे?

गोवा फॉरवर्ड पक्षाने अश्लील व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी पूनम पांडे विरोधात पोलिस तक्रार केली. गोव्यात पूनमने काणकोण येथील चापोली धरणावर एक मादक व्हिडिओ शूट केला होता. हे धरण पाटबंधारे खात्याच्या नियंत्रणाखाली आहे. या पार्श्वभूमीवर व्हिडिओबाबत गोवा फॉरवर्ड पक्षाने संताप व्यक्त केला आहे. भाजपा गोव्याला पॉर्न डेस्टिनेशन करु पाहतेय का? असा सवाल करत त्यांनी पूनमवर जोरदार टीका केली.

गोवा फॉरवर्ड महिला शाखेच्या अध्यक्षा अश्मा सय्यद यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे केली. "आधीच गोव्याला पार्टी डेस्टिनेशन व ड्रग्ज डेस्टिनेशन म्हटले जाते. आता या राज्याची ओळख पॉर्न डेस्टिनेशन करायची आहे का?" अशा शब्दात त्यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला.

हनीमूनच्या वेळी पतीने मारहाण केल्याचा केला होता आरोप
पूनम गोव्यात हनीमूनसाठी गेली होती. त्याचवेळी तिने हा व्हिडिओ शूट केल्याचे सांगितले जाते. गोव्यातच हनीमूनच्या वेळी पती सॅम बॉम्बेने आपल्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप पूनमने केला होता. त्यामुळे ती चर्चेत आली होती, त्यानंतर पोलिसांनी सॅमला ताब्यात घेतले होते. मात्र, नंतर पूनम आणि सॅम बॉम्बे यांनी सामंजस्याने हा वाद मिटवला होता. सॅमबरोबरच्या आपल्या नात्यावर बोलताना पूनमने एका मुलाखती सांगितले होते की, आम्ही पुन्हा एकदा एकत्र आहोत.