आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक:लग्नाच्या 13 दिवसांनी पूनम पांडेचा नव-यावर मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप, गोवा पोलिसांकडून सॅम बॉम्बेला अटक

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • याच महिन्यात पूनम पांडे सॅम बॉम्बेसोबत विवाहबद्ध झाली होती.

प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे याच महिन्यात आपला बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत लग्नबंधनात अडकली आहे. लग्नाचे फोटो शेअर करुन पूनमने लग्नाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली होती. शिवाय गोव्याला हनिमूनला जाण्यापूर्वीचेही फोटो तिने काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले होते. मात्र आता पूनमने आपल्या पतीवर तिला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

गोवा पोलिसांनी सॅम बाँम्बेला याप्रकरणी अटक केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पूनम पांडेचा पती सॅम बॉम्बेला मंगळवारी गोव्यात अटक करण्यात आली. पूनमने पतीविरोधात जीवे मारण्याची धमकी व मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना दक्षिण गोव्यातील कैराकोना गावातील आहे. येथे पूनम पांडे एका चित्रपटाचे शूटिंग करत होती. सोमवारी उशीरा रात्री तिने तक्रार दाखल केली. त्यानंतर सॅम बॉम्बेला अटक करण्यात आली आणि पूनमची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

View this post on Instagram

Having the best honeymoon :)

A post shared by Poonam Pandey Bombay (@ipoonampandey) on Sep 18, 2020 at 1:46am PDT

  • पूनम पांडेने सॅम बॉम्बेशी सिक्रेट लग्न केले होते

पूनम पांडेने यावर्षी 10 सप्टेंबर रोजी आपला प्रियकर सॅम बॉम्बेसोबत सिक्रेट लग्न केले होते. सिक्रेट वेडिंगनंतर दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर लग्न समारंभाची काही छायाचित्रे शेअर केली होती. इंस्टाग्रामवर छायाचित्रे शेअर करुन पूनम पांडेने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, "पुढील सात जन्म तुझ्यासोबत राहून आनंद होईल."

पूनम पांडे यांनी या सिक्रेट वेडिंगबद्दल एका मुलाखतीत सांगितले होते की, सध्याच्या कोरोना महामारीमुळे आपल्याला दररोज वाईट बातमी ऐकायला मिळत आहे, अशा परिस्थितीत आम्ही ठरवलं की थोडा आनंद देऊयात.

2011 च्या वर्ल्डकप दरम्यान पूनम पांडे पहिल्यांदा चर्चेत आली होती. भारतीय संघाने ट्रॉफी जिंकल्यास ती न्यूड होईल, असे ती त्यावेळी म्हणाली होती. पूनम पांडेने 2013 मध्ये 'नशा' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर पूनम हिंदी तसेच कन्नड आणि तमिळ चित्रपटांमध्येही झळकली.

  • अॅड फिल्ममेकर आहे सॅम बॉम्बे

सॅम बॉम्बेचा जन्म संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई येथे झाला. तो अ‍ॅड-फिल्ममेकर आणि निर्माता आहे. 36 वर्षीय सॅमने अक्षय कुमार, रणबीर कपूर, दीपिका पादुकोण, जॅकलिन फर्नांडिस, तमन्ना भाटिया, अल्लू अर्जुन आणि इतर नामांकित फिल्मस्टार्ससोबत प्रोजेक्ट केले आहेत. सॅमने सध्याच्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी खेळाडू युवराज सिंग या क्रिकेटपटूंबरोबरही काम केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ओप्पो, स्पार्क्स, अॅमेझॉन या प्रसिद्ध ब्रँड्ससाठी त्याने अनेक जाहिराती दिग्दर्शित केल्या आहेत.

View this post on Instagram

As shot by @prasadnaaik Thank you baba ❤️

A post shared by Sam Bombay (@sambombay) on Jun 6, 2018 at 11:31am PDT

बातम्या आणखी आहेत...