आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुन्हा वादात सापडली पूनम पांडे:पूनमवर अश्लील व्हिडिओ शूट केल्याचा आरोप, गोव्यात तक्रार दाखल; विरोधकांचा सवाल - भाजपा गोव्याला पॉर्न डेस्टिनेशन करु पाहतेय का?

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गोवा फॉरवर्ड पक्षाने अश्लिल व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी पूनम पांडे विरोधात पोलिस तक्रार केली आहे.

लग्नानंतर काही दिवसांतच पतीवर गंभीर आरोप करणारी पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पूनमवर गोव्यात अश्लील व्हिडिओ शूट केल्याचा आरोप आहे. तिच्याविरूद्ध गोवा फॉरवर्ड पक्षाच्या महिला शाखेतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूनम व्यतिरिक्त तिचा व्हिडिओ शूट करणार्‍या अज्ञात व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपा गोव्याला पॉर्न डेस्टिनेशन करु पाहतेय

गोवा फॉरवर्ड पक्षाने अश्लिल व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी पूनम पांडे विरोधात पोलिस तक्रार केली आहे. गोव्यात पूनमने काणकोण येथील चापोली धरणावर एक मादक व्हिडिओ शूट केला. हे धरण पाटबंधारे खात्याच्या नियंत्रणाखाली आहे. या पार्श्वभूमीवर व्हिडिओबाबत गोवा फॉरवर्ड पक्षाने संताप व्यक्त केला आहे. भाजपा गोव्याला पॉर्न डेस्टिनेशन करु पाहतेय का? असा सवाल करत त्यांनी पूनमवर जोरदार टीका केली.

गोवा फॉरवर्ड महिला शाखेच्या अध्यक्षा अश्मा सय्यद यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. "आधीच गोव्याला पार्टी डेस्टिनेशन व ड्रग्ज डेस्टिनेशन म्हटले जाते. आता या राज्याची ओळख पॉर्न डेस्टिनेशन करायची आहे का?" अशा शब्दात त्यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.

हनीमूनच्या वेळी पतीने मारहाण केल्याचा केला होता आरोप
पूनम गोव्यात हनीमूनसाठी गेली होती. त्याचवेळी तिने हा व्हिडिओ शूट केल्याचे सांगितले जाते. गोव्यातच हनीमूनच्या वेळी पती सॅम बॉम्बेने आपल्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप पूनमने केला होता. त्यामुळे ती चर्चेत आली होती, त्यानंतर पोलिसांनी सॅमला ताब्यात घेतले होते. मात्र, नंतर पूनम आणि सॅम बॉम्बे यांनी सामंजस्याने हा वाद मिटवला होता. सॅमबरोबरच्या आपल्या नात्यावर बोलताना पूनमने एका मुलाखती सांगितले होते की, आम्ही पुन्हा एकदा एकत्र आहोत.