आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूनमची आपबिती:2 वर्षांपूर्वी पूनमने राज कुंद्राविरोधात एफआयआर दाखल केला होता, म्हणाली - मला धमकावून कॉन्ट्रॅक्टवर सही करुन घेतली, माझा फोन नंबरही लीक केला होता

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन महिन्यांसाठी पूनमला देश सोडावा लागला होता

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अश्लील चित्रपट बनवणे आणि अॅपवर ते स्ट्रीम केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दरम्यान काही कलाकार त्याच्या समर्थनार्थ पुढे आले तर काहींनी मात्र त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आता पूनम पांडेने राज कुंद्रा प्रकरणात उडी घेतली आहे.

पूनम पांडेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीशी संबंधित लोकांवर फौजदारी खटला दाखल करण्याची विनंती केली आहे. विशेष म्हणजे 2019 मध्येही पूनमने राज कुंद्रावर गंभीर आरोप करत राज आणि त्याच्या एका सहकारी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. राज कुंद्राच्या कंपनीने बेकायदेशीररित्या आपल्या फोटो आणि व्हिडिओचा वापर केल्याचा आरोप पूनमने केला होता.

अ‍ॅपवर खासगी नंबर लीक केला होता
एका मुलाखतीत पूनमने राज कुंद्रावर गंभीर आरोप केले आहेत. तिने सांगितल्यानुसार, मला धमकावले गेले आणि माझ्याकडून जबरदस्तीने करारावर सही करुन घेण्यात आली होती. ज्यात मला त्यांच्या इच्छेनुसार शूट करणे, पोज देणे असे म्हटले होते. आणि मी तसे न केल्यास माझ्या काही खासगी गोष्टी लीक केल्या जातील, असे या करारात लिहिले असल्याचे पूनमने सांगितले.

पूनमने पुढे सांगितले, मी या करारावर सही करण्यास इच्छूक नव्हते. मला करार रद्द करायचा होता. तेव्हा त्यांनी माझा मोबाइल नंबर लीक केला. ज्यात ‘मला आता फोन करा. मी तुमच्यासाठी माझे कपडे उतरवेन.’ असे म्हटले होते.

तीन महिन्यांसाठी देश सोडावा लागला होता
'द जर्नी ऑफ कर्मा' आणि 'आ गया हीरो' या चित्रपटांमध्ये झळकलेल्या पूनमने सांगितल्यानुसार, तिचा खासगी मोबाइल नंबर लीक झाल्यानंतर तिला हजारो फोन आले आणि फोन करणारे तिच्याकडे विचित्र मागण्या करत होते. लोकांनी तिला अश्लील फोटो पाठवण्यास सुरुवात केली होती. या प्रकरणानंतर कंटाळून तीन महिन्यांसाठी पूनम देश सोडून परदेशी निघून गेली होती. परंतु परत आल्यानंतर तिला पुन्हा हे सहन करावे लागले, त्यामुळे तिने आपला नंबर बदलला होता, असे तिने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...