आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉमेडियनला 47 वर्षानंतर शिक्षा:1975 पासून सुरू असलेल्या लैंगिक छळ प्रकरणात बिल कॉस्बी दोषी, अभिनेत्याला 4 कोटींचा दंडही

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिल कॉस्बीने आरोप फेटाळून लावले

अमेरिकेतील लोकप्रिय अभिनेता-कॉमेडियन बिल कॉस्बी गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर सुरू असलेल्या एका खटल्यामुळे चर्चेत आहे. बिलवर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आता मंगळवारी कॅलिफोर्निया न्यायालयाने बिल कॉस्बीला दोषी ठरवले आहे.

बिल याला पीडितेला 4 कोटींचे नुकसान भरपाई द्यावी लागेल
84 वर्षीय बिल कॉस्बीवर 2014 पासून प्लेबॉय मॅन्शनमध्ये अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. वृत्तानुसार, पीडिताने सांगितले की, बिल कॉस्बीने 1975 मध्ये प्लेबॉय मॅन्शनमधील गेम रूमजवळ तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. त्यावेळी पीडिता 16 वर्षांची होती, आता ती 64 वर्षांची आहे. या प्रकरणात, न्यायालयाने बिल याला दंडात्मक नुकसान म्हणून पीडितेला 5 लाख डॉलर म्हणजेच सुमारे 4 कोटी रुपये देण्यास सांगितले आहे. या प्रकरणी बिलला तब्बल 47 वर्षांनी शिक्षा झाली आहे.

तब्बल 5 दशकांनंतर न्यायालयाने हा निकाल दिला
बिल कॉस्बीने पीडितेचा विनयभंग केल्यानंतर त्याच्यावर लैंगिक छळाचा खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्याच्या सुनावणीवर आता पाच दशकांनंतर न्यायालयाने निर्णय दिला आहे. न्यायालयाने पीडितेच्या बाजूने निर्णय दिला आणि बिलला दोषी ठरवले. या प्रकरणाशिवाय बिल कॉस्बीवर अनेक प्रकरणे नोंदली गेली आहेत, ज्यामध्ये अनेक महिलांनी त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.

बिल कॉस्बीने आरोप फेटाळून लावले
वृत्तानुसार, बिल कॉस्बी गेल्या आठवड्यात या प्रकरणासंदर्भात न्यायालयात खटल्यासाठी हजर झाला, त्यादरम्यान त्याने त्याच्यावरील आरोप पूर्णपणे नाकारले. दोन आठवडे या प्रकरणाची सुनावणी झाली. पीडितेने सांगितल्यानुसार, जेव्हा तिच्यासोबत ही घटना घडली तेव्हा ती 15 वर्षांची होती. यानंतर वयाच्या 16 व्या वर्षी तिने बिल कॉस्बीविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता.

बातम्या आणखी आहेत...