आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनी स्पीयर्सने सॅम असगरीसोबत थाटले लग्न:गायिकेच्या लग्नात पुर्वाश्रमीचा पती जेसन अलेक्झांडरने घातला गोंधळ, पोलिसांनी केली अटक

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनी-सॅम यांच्या वयात 12 वर्षांचे अंतर आहे - फाइल फोटो - Divya Marathi
ब्रिटनी-सॅम यांच्या वयात 12 वर्षांचे अंतर आहे - फाइल फोटो
  • पोलिसांनी जेसन अलेक्झांडरला अटक केली

लोकप्रिय अमेरिकन पॉप गायिका ब्रिटनी स्पीयर्सने गुरुवारी (9 जून) तिचा प्रियकर सॅम असगरीसोबत लग्न केले. दरम्यान ब्रिटनीच्या लग्नात अशी एक घटना घडली ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. झाले असे की, लॉस एंजिलिसमध्ये झालेल्या ब्रिटनीच्या लग्नात तिचा पुर्वाश्रमीचा पती जेसन अलेक्झांडरने जबरदस्तीने शिरण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर जेसनने तिच्या लग्नात खूप गोंधळ घातला आणि तिची लग्नाची पार्टी उधळण्याचाही प्रयत्न केला.

पोलिसांनी जेसन अलेक्झांडरला अटक केली
वृत्तानुसार, ब्रिटनीच्या लग्नात गोंधळ घातल्यानंतर जेसन अलेक्झांडरला पोलिसांनी अटक केली. यानंतर त्याला पोलिस कोठडीही सुनावण्यात आली आहे. ब्रिटनीच्या लग्नाच्या काही तास आधी जेसनने ब्रिटनीच्या कॅलिफोर्नियातील घरीही शिरण्याचा प्रयत्न केला होता. जेसनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर लाईव्ह येऊन याबद्दल सांगितले आणि मग तो थेट ब्रिटनीच्या लग्नाच्या ठिकाणी गेला होता.

लाइव्ह व्हिडिओमध्ये, जेसन सुरक्षा रक्षकांना सांगतोय की, ब्रिटनीने त्याला तिच्या लग्नासाठी आमंत्रित केले आहे. मात्र, सुरक्षारक्षकांनी त्याला अडवले. जेव्हा सुरक्षा रक्षकांनी जेसनला सर्वोतोपरी प्रयत्न करूनही आत जाऊ दिले नाही तेव्हा त्याने जबरदस्तीने ब्रिटनीच्या लग्नात घुसण्याची धमकी दिली होती.

जेसनचे सुरक्षा रक्षकांशी झाले भांडण
रिपोर्ट्सनुसार, जेसन अलेक्झांडरची सुरक्षा रक्षकांसोबत वाद झाला होता. यावेळी जेसन ओरडून म्हणत होता की, "ब्रिटनी माझी पहिली पत्नी आहे. मी तिचा पहिला नवरा आहे. मी तिच्या लग्नासाठी येथे आलो आहे." ब्रिटनीने सॅमसोबत तिसरे लग्न केले आहे. याआधी तिने दोनदा लग्न केले आहे. ब्रिटनीने 2004 मध्ये तिचा बालपणीचा मित्र जेसन अलेक्झांडरशी लग्न केले होते. पण, 55 तासांनंतरच त्यांचे लग्न मोडले.

त्यानंतर ब्रिटनीने रॅपर केविन फेडरलिनसोबत दुसरे लग्न केले, या लग्नापासून तिला सीन प्रेस्टन (16) आणि जेडेन जेम्स (15) ही दोन मुले आहेत. तिचे हे लग्नही फार काळ टिकले नाही आणि 2007 मध्ये तिने केविनपासून घटस्फोट घेतला.

सप्टेंबर 2021 मध्ये ब्रिटनी आणि सॅमचा झाला होता साखरपुडा
ब्रिटनी स्पीयर्स गेल्या सहा वर्षांपासून सॅम असगरीला डेट करत होती. आता दोघांनी त्यांच्या नात्याचे रुपांतर लग्नत केले आहे. सप्टेंबर 2021 मध्ये ब्रिटनी आणि सॅम यांचा साखरपुडा झाला होता. तिने सॅमसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता ज्यात ब्रिटनी तिची एंगेजमेंट रिंग फ्लाँट करताना दिसली. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले होते की, 'माझा विश्वास बसत नाहीये.'

ब्रिटनी-सॅम यांच्या वयात 12 वर्षांचे अंतर
ब्रिटनी आणि सॅम यांची भेट 2016 मध्ये 'स्लंबर पार्टी' या म्युझिक व्हिडिओच्या सेटवर झाली होती. या भेटीनंतर दोघांची मैत्री झाली आणि नंतर ते रिलेशनशिपमध्ये आले. ब्रिटनी 40 वर्षांची आहे आणि तिचा नवरा सॅम 28 वर्षांचा आहे. त्यानुसार दोघांच्या वयात 12 वर्षांचे अंतर आहे.

बातम्या आणखी आहेत...