आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूडचे लोकप्रिय गायिक आणि संगीतकार बप्पी लहरी यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. त्यांची कोविड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बप्पी लहरी यांची मुलगी रीमा यांनी ही माहिती दिली. तसेच मागील काही दिवसांत बप्पी लहरी यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी खबरदारी म्हणून कोविड 19 ची चाचणी करुन घेण्याचे आवाहन त्यांच्या कुटुंबियांनी केले आहे.
रीमा यांनी निवेदनात म्हटले आहे की, ‘सर्व खबरदारी घेऊनही दुर्दैवाने बप्पी लहरी यांची कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. ते सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात डॉ. उद्वाडिया यांच्या देखरेखीखाली आहेत. ते लवकरच बरे होतील आणि परत येतील."
बप्पी लहरी यांच्या प्रवक्त्याचे निवेदन
बप्पी लहरी यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘त्यांना त्यांचे चाहते, मित्र आणि भारत व विदेशातील सर्व लोकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत.’
गेल्या काही दिवसांत बरेच सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात सापडले
बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. बप्पी लहरी यांच्यापूर्वी आमिर खान, आर माधवन, परेश रावल, मिलिंद सोमण, रोहित सराफ, सिद्धांत चतुर्वेदी, रणबीर कपूर, मनोज बाजपेयी, कार्तिक आर्यन, संजय लीला भन्साळी आणि सतीश कौशिक यांच्यासह अनेक सेलेब्रिटींचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. रणबीर कपूरसह अनेक सेलिब्रिटींनी कोरोनावर यशस्वी मात देखील केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.