आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज कुंद्रा पोर्नोग्राफी केस:मुंबई गुन्हे शाखेच्या टीमकडून चार लोकांना अटक, अभिनेत्रीकडून जबरदस्तीने पॉर्न फिल्म शूट केल्याचा आरोप

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नरेश रामावतार पाल गोवा आणि शिमल्यात लपून बसला होता, असे पोलिसांनी सांगितले होते. गुरुवारी पाल वर्सोव्यात पोहोचल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

पॉर्नोग्राफी प्रकरणी मंगळवारी मोठी कारवाई करत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने वर्सोवा आणि बोरिवली परिसरातून चार जणांना अटक केली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यालाही याच प्रकरणात अटक करण्यात आली होती. दोन महिने तुरुंगात घालवल्यानंतर त्याला 20 सप्टेंबर 2021 रोजी 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता. पोलिसांनी ज्यांना अटक केली होती त्यात राज कुंद्राच्या कास्टिंग डायरेक्टरचाही समावेश आहे. कुंद्रासोबतच त्याचा सहकारी आणि या प्रकरणातील सहआरोपी रायन थॉर्प यालाही जामीन मंजूर करण्यात आला होता.

पोलिसांनी आज नरेश रामावतार पाल (29), सलीम सय्यद (32), अब्दुल सय्यद (24) आणि अमन बर्नवाल (22) यांना अश्लिल वेब सीरिजच्या शूटिंगच्या आरोपाखाली अटक केली. केवळ दोन हजार रुपये घेऊन या शूटमध्ये सहभागी झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने राज कुंद्रा आणि अन्य तिघांविरुद्ध अश्लील चित्रपट बनवून काही अॅप्सच्या मदतीने ऑन एअर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

अभिनेत्रीला बळजबरीने शूटिंग करण्यास भाग पाडल्याचा आरोप
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कास्टिंग डायरेक्टर नरेश रामावतार पाल याने एका अभिनेत्रीला बळजबरीने मढ येथील एका बंगल्यात अश्लिल चित्रपटाच्या शूटिंगसाठी नेले. जिथे सलीम सय्यद, अब्दुल सईद आणि अमन बर्नवाल आधीच उपस्थित होते. त्याने अभिनेत्रीला जबरदस्तीने शूट करायला लावल्याचा आरोप आहे.

आरोपी गोवा आणि शिमल्यात लपून बसले होते
पाल गोवा आणि शिमल्यात लपून बसला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. गुरुवारी पाल वर्सोव्यात पोहोचल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. यानंतर या प्रकरणातील अन्य आरोपींनाही वर्सोवा आणि बोरिवली येथून अटक करण्यात आली.

गुन्हे शाखेने एकूण चार गुन्हे दाखल केले
क्राइम ब्रँचने एकूण चार गुन्हे दाखल केले होते, ज्यामध्ये उद्योगपती राज कुंद्रा, अभिनेत्री-मॉडेल गेहाना वशिष्ठ आणि इतरांना अटक करण्यात आली होती. तर फेब्रुवारी 2021 मध्ये प्रॉपर्टी सेलने पॉर्न फिल्म रॅकेटचा पर्दाफाश केला आणि मालवणी पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल केले होते.

बातम्या आणखी आहेत...