आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Pornography Case: Mumbai Police Opposed Raj Kundra's Bail Plea In Court, Said He Is A British Citizen, May Try To Escape From The Country

पोर्नोग्राफी प्रकरण:मुंबई पोलिसांनी राज कुंद्राच्या जामीन अर्जाला न्यायालयात विरोध केला, सांगितले - तो ब्रिटिश नागरिक आहे, कधीही देश सोडून पळून जाऊ शकतो

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिस म्हणाले - राज कुंद्राला जामीन मिळाल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल

पोर्नोग्राफी प्रकरणात तुरुंगात असलेला अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राच्या जामीन अर्जावर मुंबईचे सत्र न्यायालय आता 20 ऑगस्ट रोजी निर्णय देणार आहे. तोपर्यंत त्याला तुरुंगात राहावे लागेल. राज कुंद्राच्या जामीन अर्जावर मंगळवारी (10 ऑगस्ट) सुनावणी झाली, जी पुढे ढकलण्यात आली आहे. या सुनावणीदरम्यान पोलिसांनी राज कुंद्राच्या जामीन अर्जाला विरोध दर्शवला आणि न्यायालयाला सांगितले की, त्याला जामीन दिल्यास समाजाला चुकीचा संदेश जाईल. राज कुंद्राची जामिनावर सुटका झाल्यास तो पुन्हा तोच गुन्हा करू शकतो आणि देश सोडून पळून जाऊ शकतो असेही पोलिसांनी म्हटले आहे. राज कुंद्राकडे युकेचे नागरिकत्व असल्यामुळे पोलिसांनी हे सांगितले आहे.

राज कुंद्राने दाखल केलेल्या जामीन अर्जात असे म्हटले आहे की, पोलिसांनी एप्रिलमध्ये या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. त्याचे नाव ना आरोपपत्रात होते ना एफआयआरमध्ये. याचिकेत म्हटले आहे की, आरोपपत्रात नाव असलेले आरोपी जामिनावर बाहेर आहेत.

राज कुंद्राला जामीन मिळाल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल
राज कुंद्राच्या जामीन अर्जाला उत्तर देताना मुंबई पोलिसांनी मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाला सांगितले की, गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. बनवलेले सर्व व्हिडिओ कुठे अपलोड केले गेले या प्रकरणी पोलीस अजूनही तपास करत आहेत. पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपीला जामीन मिळाल्यास तो अश्लील व्हिडिओ अपलोड करून असेच गुन्हे करत राहू शकतो. ज्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाईल.

ब्रिटिश नागरिक, देश सोडून पळून जाऊ शकतो
या प्रकरणात राज कुंद्रा आरोपी प्रदीप बक्षीशी संबंधित असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. त्याने प्रदीपशी संपर्क साधण्याचा आणि नंतर तपास टाळण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी पुढे न्यायालयाला सांगितले की, जर राज कुंद्राला जामीन मिळाला तर तो ब्रिटिश नागरिक असल्याने देश सोडून पळून जाऊ शकतो.

याआधीही जामिन अर्ज फेटाळला होता
राज कुंद्राने जामिन मिळावा यासाठी 28 जुलै रोजी अर्ज केला होता. परंतु त्याचा जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, राज कुंद्राच्या विरोधात केवळ साक्षीदार नाही तर सबळ पुरावे देखील आहेत. राज कुंद्राच्या कार्यालयात घातलेल्या छाप्या दरम्यान 68 अॅडल्ट व्हिडिओ पोलिसांनी जप्त केले आहेत. राजला जर जामिन दिला तर तो साक्षीदार आणि पुरावे नष्ट करू शकतो, त्यामुळे त्याला जामिन दिला जाऊ नये, अशी मागणी पोलिसांनी केली. पोलिसांनी केलेल्या या युक्तीवादामुळे न्यायालयाने राज कुंद्राचा जामिन अर्ज फेटाळून लावला होता.

शार्लिन चोप्राचा जबाब महत्त्वाचा
राज कुंद्रा प्रकरणामध्ये शर्लिन चोप्राने नोंदवलेला जबाब महत्त्वाचा मानला जात आहे. तिने दिलेल्या साक्षीमुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागू शकते. शर्लिनने राजला अटक होण्याआधी एप्रिल महिन्यात त्याच्याविरोधात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. मुंबई पोलिसांनी राज कुंद्राप्रकरणी शर्लिनची सलग आठ तास चौकशी केली. त्यावेळी शर्लिनने राज आणि त्याच्या कंपनीसोबत असलेल्या संबंधांची माहिती दिली. राज कुंद्रासोबत व्हॉटसअॅप चॅटवर झालेले संभाषण आणि कराराची कॉपीही तिने पोलिसांना दिली.

या कलमांखाली राजला झाली अटक
राज कुंद्राला 19 जुलै रोजी अटक करण्यात आली. त्याला प्रथम 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली, तर फोर्ट कोर्टाने (एस्प्लेनेड कोर्ट) नंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. राज कुंद्रासह त्याचा आयटी प्रमुख रायन थोरपे याच्या जामीन अर्जावरही सुनावणी होणार होती. रायनच्या जामीन अर्जावरही निर्णय आता 20 ऑगस्टलाच येईल. राज कुंद्राच्या विरोधात आयपीसी कलम 292, 296 अश्लिल व्हिडिओ बनवणे, विकणे, कलम 420 लोकांचा विश्वासघात करणे,सूचना प्रौद्योगिकी अधिनियम अंतर्गंत कलम 67, 67अ, अश्लिल व्हिडिओ चित्रीत करणे आणि ते ऑनलाइन शेअर करणे, सामग्री करणे आणि प्रसारित करणे, कलम 2 जी, 3, 4, 6, 7 महिलांवर अश्लिल फिल्म बनवणे, ते विकणे आणि प्रसारित करणे या कलमांतर्गंत अटक झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...