आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोर्नोग्राफी प्रकरण:राज कुंद्राच्या जामिन अर्जावर आज येऊ शकतो निर्णय, शिल्पा आणि शर्लिनसह 43 लोकांना आरोपपत्रात साक्षीदार बनवण्यात आले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज कुंद्रावर शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांनी अनेक गंभीर आरोप लावले. मुंबई सायबर पोलिसांकडे 2020 मध्ये हे प्रकरण नोंदवण्यात आले होते.

पोर्नोग्राफी प्रकरणात तुरुंगात असलेल्या राज कुंद्राच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज कुंद्राला 19 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्याला प्रथम 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली, तर फोर्ट कोर्टाने (एस्प्लेनेड कोर्ट) नंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तेव्हापासून तो तुरुंगात आहे. सत्र न्यायालयाने कुंद्राचा एक जामीन अर्ज फेटाळला आहे. शर्लिन चोप्रापासून पूनम पांडेपर्यंत अनेकांनी राज कुंद्रावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.. हे प्रकरण मुंबई सायबर पोलिसांकडे 2020 मध्ये नोंदवण्यात आले होते.

राज कुंद्रासह त्याचा आयटी प्रमुख रायन थारप याच्या जामीन अर्जावरही आज सुनावणी होणार आहे. न्यायालयाने जामीन अर्जावर मुंबई पोलिसांकडून उत्तर मागितले होते. दरम्यान बुधवारी मुंबई पोलिसांनी राज कुंद्रासह 11 आरोपींविरोधात 1500 पानांची सप्लिमेंट्री चार्जशीट दाखल केली. अभिनेत्री शिल्पा शेट्टी, शर्लिन चोप्रासह 43 साक्षीदारांचे जबाब आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आले आहेत. या आरोप पत्रानंतर कुंद्राच्या जामिनाचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे. मात्र, मुंबई पोलिस कुंद्राच्या जामिनाला विरोध करतात की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सत्र न्यायालयाने यापूर्वीच जामीन अर्ज फेटाळला आहे
यापूर्वी 28 जुलै रोजी सत्र न्यायालयाने राज कुंद्राची जामीन याचिका फेटाळली होती. पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते की, राज कुंद्राच्या विरोधात केवळ साक्षीदार नाही तर सबळ पुरावे देखील आहेत. राज कुंद्राच्या कार्यालयात घातलेल्या छाप्या दरम्यान 68 अॅडल्ट व्हिडिओ पोलिसांनी जप्त केले आहेत. राजला जर जामिन दिला तर तो साक्षीदार आणि पुरावे नष्ट करू शकतो, त्यामुळे त्याला जामिन दिला जाऊ नये, अशी मागणी पोलिसांनी केली होती. पोलिसांनी केलेल्या या युक्तीवादामुळे न्यायालयाने राज कुंद्राचा जामिन अर्ज फेटाळून लावला होता.

मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे कुंद्राचा अर्ज
सत्र न्यायालयाने राज कुंद्राची जामीन याचिका फेटाळल्यानंतर ऑगस्टमध्ये त्याने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. राज कुंद्राने दाखल केलेल्या जामीन अर्जात म्हटले होते की, पोलिसांनी एप्रिलमध्ये या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. त्याचे नाव ना आरोपपत्रात होते ना एफआयआरमध्ये. याचिकेत म्हटले आहे की, आरोपपत्रात नाव असलेले आरोपी जामिनावर बाहेर आहेत. राज कुंद्राचे वकील सुभाष जाधव म्हणाले की, राज कुंद्रावरील सर्व आरोप निराधार आहेत. राज कुंद्राने तयार केलेला कंटेंट पोर्नोग्राफी नव्हे तर इरॉटिक कंटेंट आहे.

या कलमांखाली राज कुंद्रावर खटला चालवला गेला

  • भादंवी कलम 292, 296 - अश्लील सामग्री बनविणे आणि विक्री करणे
  • कलम 420 - विश्वासघात, फसवणूक
  • माहिती तंत्रज्ञान कायदा कलम, 67, 67 (A) - इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील सामग्री टाकणे आणि ती प्रसारित करणे
  • कलम 2 (जी) 3, 4, 6, 7 - महिलांशी संबंधित अश्लील चित्रपट बनविणे, विक्री करणे आणि त्याचा प्रसार करणे.

अश्लीलताविरोधी कायदा

इंटरनेटद्वारे पोर्नोग्राफीचा व्यापार हा दिवसेंदिवस वेगाने वाढला आहे. यामुळेच पोर्नोग्राफी हा मोठा व्यवसाय झाला आहे. पोर्नोग्राफीमध्ये फोटो, व्हिडिओ, मजकूर, ऑडिओ यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. अशाप्रकारचा कंटेंट इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रकाशित करणे, इतरांना पाठवणे किंवा इतरांमार्फत ते प्रकाशित करणे यासाठी अँटी-पोर्नोग्राफी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो.

अश्लील व्हिडिओ बनवणे बेकायदेशीर
इतरांचे अश्लील व्हिडिओ बनवणे, एमएमएस बनवणे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून इतरांना ते उपलब्ध करुन देणे हे अश्लीलताविरोधी कायद्याच्या कार्यक्षेत्रात येते. तसेच, हा कायदा बेकायदेशीर किंवा संमतीशिवाय कोणालाही अश्लील सामग्री पाठवणाऱ्यांना लागू आहे. अश्लील साहित्य प्रकाशित करणे किंवा पाठवणे बेकायदेशीर आहे. सोबतच ते पाहण्यावर, ऐकण्यावर आणि वाचण्यावर कोणतीही बंदी नाही. परंतु, ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’ पाहणे बेकायदेशीर आहे.

अशा प्रकरणात काय शिक्षा होऊ शकते?
अश्लीलताविरोधी कायद्या अंतर्गत येणार्‍या प्रकरणांमध्ये आयटी कायदा 2009 च्या कलम 67 (अ) आणि आयपीसीच्या कलम 292, 293, 294, 500, 506 व 509 अंतर्गत शिक्षेची तरतूद आहे. पहिल्या गुन्ह्यात गुन्ह्याच्या गंभीरतेनुसार 5 वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. पण, अशा गुन्ह्यात दुसऱ्यांदा पकडल्यास तुरुंगवासाची शिक्षा सात वर्षांपर्यंत वाढू शकते.

बातम्या आणखी आहेत...