आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉवर रेंजर फेम जेसन डेविड फ्रँकची आत्महत्या:वयाच्या 49 व्या वर्षी जगाचा घेतला निरोप, चाहत्यांनी व्यक्त केला शोक

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता आणि मिक्स मार्शल आर्टिस्ट असणारा पावर रेंजर्स स्टार जेसन डेविड फ्रँकचे निधन झाले आहे. वयाच्या 49 व्या वर्षी टेक्सासमध्ये त्याने आत्महत्या केली. फ्रँक्स ऑन द पॉवर रेंजर्सचा कलाकार वॉल्टर ई जोन्सने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन जेसन डेविड फ्रँकच्या निधनाची माहिती दिली आणि त्याला श्रद्धांजली वाहिली.

कोण होता जेसन डेविड फ्रँक?
जेसन डेविड फ्रँक एक अभिनेता आणि एमएमए फायटर होता. त्याला खरी ओळख प्रसिद्ध टीव्ही शो मायटी मॉर्फिन्स पॉवर रेंजर्समधून मिळाली होती. या शोमध्ये त्याने टॉमी ऑलिव्हरची भूमिका साकारली होती. शोची कथा एका टीनएजर ग्रुपवर बेतली होती, ज्यांना जॉर्डन नावाच्या रेंजरने दुष्ट शक्तींपासून जगाला वाचवण्यासाठी निवडले.

फ्रँकने 28 ऑगस्ट 1993 ते 27 नोव्हेंबर 1995 या कालावधीत शोच्या पहिल्या सीझनमध्ये टॉमी ऑलिव्हरची भूमिका केली होती. ग्रीन रेंजर म्हणून त्याची भूमिका चौदा भागांनंतर संपली. परंतु त्याच्या लोकप्रियतेमुळे, त्याला व्हाइट रेंजर आणि उर्वरित मालिकेसाठी संघाचा नवीन कमांडर म्हणून परत बोलावण्यात आले होते.

निधनावर वॉल्टर ई जोन्सने व्यक्त केला शोक
वॉल्टर ई जोन्सने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये वॉल्टर ई जोन्सने लिहिले, 'तू आम्हाला सोडून गेला आहेस, यावर माझा विश्वास बसत नाही. आमच्या स्पेशल फॅमिलीमधील एक सदस्य कमी झाला.' वॉल्टर ई जोन्सच्या या पोस्टला कमेंट करुन जेसन डेविड फ्रँकच्या चाहत्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली.

जेसन डेविड फ्रँक यांचे एजंट, जस्टिन हंट यांनी एका निवेदनात म्हटले की, या कठीण वेळी त्याच्या कुटुंबाच्या आणि मित्रांच्या प्राव्हसीचा आदर करणे महत्वाचे आहे, कारण आमची प्रिय व्यक्ती आम्हाला सोडून गेली आहे.

बातम्या आणखी आहेत...