आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 भागात बनणार दीपिका-प्रभासचा 'प्रोजेक्ट के'!:चित्रपटाचा पहिला भाग एप्रिलमध्ये होऊ शकतो प्रदर्शित - निर्माते

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाहुबली स्टार्स प्रभास आणि दीपिका पदुकोण लवकरच तेलुगू सायन्स फिक्शन चित्रपट 'प्रोजेक्ट के'मध्ये एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात या दोघांसोबत अमिताभ बच्चनही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान, 'बाहुबली'प्रमाणेच 'प्रोजेक्ट के' देखील दोन भागात प्रदर्शित होणार असून, त्यातील पहिला भाग पुढील वर्षी एप्रिलमध्ये येऊ शकतो, असे निर्मात्यांनी सांगितले आहे. पहिल्या भागाच्या काही सीन्सचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. आता चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार आहे
पिंकविलाच्या वृत्तानुसार, 'प्रोजेक्ट के' हा चित्रपट बाहुबलीप्रमाणेच दोन भागात प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग सस्पेन्स निर्माण करणारा असेल, तर दुसरा भाग कथेचा महत्त्वाचा भाग असेल. निर्मात्यांनी सांगितल्यानुसार, हा एक मोठा चित्रपट असणार आहे. वैजयंती मूव्ही प्रोडक्शनला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 'प्रोजेक्ट के' या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.

'प्रोजेक्ट के' या चित्रपटात प्रभासचा पाहायला मिळणार कूल लूक
चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन सांगतात की, चित्रपटाच्या पहिल्या भागाचे शूटिंग सुरू झाले आहे. याशिवाय या भागात प्रभास कूल अवतारात दिसणार असल्याचेही त्याने सांगितले आहे.

'प्रोजेक्ट के' हा दीपिकाचा प्रभाससोबतचा पहिला चित्रपट
'सावित्री बायोपिक' आणि 'महानती' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक नाग अश्विन आणि प्रभास यांचा एकत्रितपणे हा पहिला प्रोजेक्ट आहे. यासोबतच दीपिकाही या चित्रपटात पहिल्यांदाच प्रभाससोबत दिसणार आहे. बिग बींबद्दल बोलायचे तर प्रभाससोबतचा त्यांचा हा दुसरा चित्रपट आहे. प्रभासने बिग बींसोबत 'आदिपुरुष'मध्येही काम केले आहे.

दीपिकाचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर घालत आहे धुमाकूळ
दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, दीपिकाची मुख्य भूमिका असलेला 'पठाण' हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडित काढले आहेत. यासोबत दीपिकाने ओम शांती ओम, तमाशा, पद्मावत, बाजीराव मस्तानी आणि चेन्नई एक्सप्रेसमध्ये काम केले आहे. तर प्रभास हा साऊथचा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने बाहुबली, आदिपुरुष, रेबेल, मिर्ची, साहो आणि राधे श्याम यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...