आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बींचा नवा चित्रपट:प्रभास-दीपिकासोबत दिसणार अमिताभ बच्चन, 'KBC'ची शूटिंग संपल्यानंतर चित्रपटाच्या चित्रीकरणावर होणार रुजू; मानधनाचा आकडा ऐकून व्हाल दंग

किरण जैनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिग बी एका दिवसात दोन एपिसोडचे शूटिंग पूर्ण करतात.

दिग्दर्शक नाग अश्विन यांच्या आगामी चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि दीपिका पदुकोण यांच्यासह बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सुमारे 100 कोटी बजेट असलेल्या या चित्रपटाचे शूटिंग पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. या मेगा बजेट चित्रपटावर काम सुरू करण्यापूर्वी बिग बी आपल्या लोकप्रिय गेम रिअ‍ॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती 12' चे शूटिंग पूर्ण करणार असल्याचे वृत्त आहे.

केबीसी या शोशी संबंधित सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, "कोरोनामुळे यावर्षी केबीसीची सुरुवात उशीरा झाली. नवीन वेळापत्रकानुसार हा शो पुढच्या वर्षाच्या सुरूवातीस संपेल. होस्ट अमिताभ बच्चन महिन्यात सुमारे 20 दिवस या शोसाठी शूट करतात. ते एका दिवसात ते दोन भागांचे शूटिंग पूर्ण करतात. कधीकधी ते सलग आठवडाभर शूट करतात आणि नंतर शोमधून एक आठवडा ब्रेक घेतात. त्यांच्या शेड्यूलनुसार ते डिसेंबर अखेरपर्यंत जानेवारीत प्रदर्शित होणा-या एपिसोडचे शूटिंग पूर्ण करतील. शोच्या निर्मात्यांकडे जवळपास 20 ते 25 बँक भाग आहेत. अशा परिस्थितीत अमिताभ पुढच्या प्रोजेक्टवर काम सुरू करण्यापूर्वी केबीसीचे शूट संपवण्याचा प्रयत्न करतील."

नाग अश्विन यांच्या या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचे फुल लेंथ पात्र असेल
सुत्रांनी पुढे म्हटले की, केबीसी 12 चा अंतिम भाग जानेवारी 2021 मध्ये शूट केला जाईल. अमिताभ यांच्या टीमनेही निर्मात्यांना यासाठी सहमती दर्शविली आहे. नाग अश्विन यांच्या या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांचे पूर्ण लांबीचे पात्र असेल.

चित्रपटासाठी 21 कोटी रुपये मानधन घेतले

अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटासाठी मोठी रक्कम घेतल्याचे वृत्त आहे. या चित्रपटासाठी त्यांचे तब्बल 21 कोटी रुपये मानधन आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणजे सध्या ते 'ब्रह्मास्त्र' आणि 'झुंड' या चित्रपटांमुळे चर्चेत आहेत. अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासोबत ते ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट करत आहेत, तर ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरू आणि आकाशसोबत ‘झुंड’मध्ये ते दिसणार आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser