आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यू पोस्टर आउट:जन्माष्टमीच्या निमित्ताने प्रभास आणि पूजा हेगडे स्टारर 'राधे श्याम'चे नवीन पोस्टर झाले रिलीज

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यामध्ये प्रभास आणि पूजा यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अनोख्या रूपामध्ये दिसणार आहेत.

प्रभासचा प्रत्येक चाहता ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे तो हाच क्षण आहे. पॅन इंडिया स्टारचा बिग कॅनव्हास, रोमँटिक ड्रामा 'राधे श्याम' पुढील वर्षी मकर संक्रांतीला देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या उत्सुकतेत आणखी भर टाकत बहुप्रतिक्षित चित्रपटाचे पोस्टर आज जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर रिलीज करण्यात आले आहे. यामध्ये प्रभास एका सुंदर टक्सिडोमध्ये आणि पूजा हेगडेने एक आकर्षक बॉल गाऊन घातलेला दिसत आहे. पोस्टर थेट एका परीकथेतून अवतरल्यासारखे भासत असून चित्रपटाने चाहत्यांसाठी साठवून ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची झलक यात आहे.

राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित, ही एक प्रेमकथा 1970 मध्ये युरोपमध्ये घडते आहे. इटली, जॉर्जिया आणि हैदराबादमध्ये चित्रीत झालेला, अत्याधुनिक व्हिज्युअल इफेक्ट्सने सज्ज राधे श्याम एका मेगा कॅनव्हासवर अवतरत असून, यामध्ये प्रभास आणि पूजा यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अनोख्या रूपामध्ये दिसणार आहेत.

दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार म्हणाले की, "या चित्रपटावर आम्ही खूप मेहनत घेतली आहे आणि आम्ही प्रेक्षकांना एक भव्य नाट्यानुभव देण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. राधे श्याम 14 जानेवारी 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत असून जन्माष्टमीच्या या विशेष दिवशी चित्रपटाचे पोस्टर सादर करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत."

'राधे श्याम' हा बहुभाषिक चित्रपट असून गुलशन कुमार आणि टी-सीरिज यांची प्रस्तुती आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे. यूव्ही क्रिएशन्सने तयार केलेल्या या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...