आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुहूर्त ठरला!:प्रभास-पूजा हेगडे स्टारर 'राधेश्याम'च्या रिलीजची तारीख झाली निश्चित, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार चित्रपट

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपट 14 जानेवारी 2022 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

अखेरीस तो दिवस उगवलाच ज्याची 'राधेश्याम' आणि प्रभासचे चाहते आतुरतेने वाट पहात होते. या चित्रपटाच्या नवीन पोस्टरसह त्याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. चित्रपटाच्या नवीन पोस्टरवर प्रभार एक डेपर लुकमध्ये यूरोपातील रस्त्यांवर भटकताना दिसत आहे. पोस्टरमध्ये लिहिले आहे की, चित्रपट येत्या मकर संक्रांती/पोंगलला म्हणजेच 14 जानेवारी 2022 मध्ये प्रदर्शित होईल.

अभिनेता प्रभासनेही त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करत 'राधेश्याम' हा रोमँटिक धाटणीचा चित्रपट 14 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे.

प्रेक्षक मोठ्या आतुरतेने या चित्रपटाची वाट पहात आहेत आणि या बातमीने प्रेक्षकांना अतिशय उत्साहित केले आहे. या चित्रपटासोबत जवळपास दशकभराने प्रभास रोमँटिक शैलीत परतत असून यामध्ये प्रभास आणि पूजा हेगडे यांची नवी जोडी पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे अनेक पोस्टर्स प्रदर्शित झाले आहेत त्यामधून प्रभास लवरबॉय इमेजमध्ये दिसत आहे.

'राधेश्याम' एक बहुभाषी चित्रपट असून गुलशन कुमार व टी-सीरीज यांच्याद्वारे प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे. ही यूवी क्रिएशन्सची निर्मिती असून भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद हे चित्रपटाचे निर्माते आहेत.

बातम्या आणखी आहेत...