आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंग अपडेट:प्रभास आणि पूजा हेगडे स्टारर 'राधे श्याम'च्या चित्रीकरणाला हैदराबादमध्ये सुरुवात, अभिनेत्रीने शेअर केला बुमरँग व्हिडिओ

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुमारे महिनाभरानंतर चित्रपट निर्मात्यांनी पुन्हा शूट सुरू केले आहे.

अभिनेता प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या आगामी 'राधे श्याम' या चित्रपटाचे शूटिंग हैदराबादमध्ये सुरू झाले आहे. पूजा हेगडे हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाच्या सेटवरील एक बुमरँग व्हिडिओ शेअर केला आहे. हा चित्रपट युरोप बेस्ड पीरियड लव्ह स्टोरी आहे. चित्रपटाचे काही सीन इटली आणि युरोपमध्येही चित्रीत करण्यात आले आहेत. नोव्हेंबरमध्ये इटलीचे शूटिंग संपल्यानंतर सुमारे महिनाभरानंतर चित्रपट निर्मात्यांनी पुन्हा शूट सुरू केले आहे.

पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे 'राधे श्याम'
चित्रपटाचे दिग्दर्शन राधाकृष्ण कुमार करत आहेत. 'राधे श्याम'मध्ये सचिन खेडेकर, प्रियदर्शी पुलिकोंडा, भाग्यश्री, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर, रिद्धी कुमार, साशा क्षेत्री, सत्यन यांच्या भूमिका आहेत. जानेवारी 2020 पासून चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते. चित्रपटात प्रभास विक्रमादित्य नावाच्या पाम रीडरची भूमिका साकारत आहे तर पूजा प्रेरणा नावाच्या संगीत शिक्षिकेच्या भूमिकेत आहे.

दीपिका आणि अमिताभसोबत झळकणार प्रभास
दिग्दर्शक नाग अश्विन यांच्या आगामी चित्रपटात दीपिका पदुकोण आणि मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासह प्रभास एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे बजेट सुमारे 100 कोटी आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुढील महिन्यापासून सुरू होईल.

बातम्या आणखी आहेत...