आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'आदिपुरुष' अपडेट:प्रभास आणि सैफ अली खान स्टारर 'आदिपुरुष'च्या चित्रीकरणाला सुरुवात , 2022 मध्ये रिलीज होणार मेगा बजेट 3 डी चित्रपट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा मेगा बजेट 3 डी चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होईल.

दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार प्रभास आणि सैफ अली खान स्टारर 'आदिपुरुष' या चित्रपटाचे शूटिंग मंगळवारपासून मुंबईत सुरू झाले आहे. प्रभासने स्वत: सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन याची घोषणा केली आहे. प्रभासने या पोस्टसह एक पोस्टरही शेअर केले आहे. या पोस्टरसह 'आदिपुरुष' आरंभ, असे कॅप्शन त्याने दिले आहे. हा मेगा बजेट 3 डी चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होईल.

दीर्घ काळापासून चर्चेत असलेल्या या चित्रपटासाठी गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरू होती. ओम राऊत यांच्या दिग्दर्शनात बनत असलेला 'आदिपुरुष' हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. या चित्रपटात प्रभास भगवान राम आणि सैफ अली खान रावणच्या भूमिकेत दिसणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी चित्रपटाच्या मोशन कॅप्चरवर 15 दिवस आधी काम सुरू केले होते. त्याचा एक फोटो सोशल मीडियावरही शेअर केला होता.

मोठ्या प्रमाणात होणार व्हीएफएक्सचा उपयोग
चित्रपटात व्हीएफएक्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार आहे. असे म्हटले जात आहे की, प्रेक्षकांनी इतके व्हीएफएक्स आजपर्यंत कोणत्याही भारतीय चित्रपटात पाहिले नसतील तेवढे या चित्रपटात असतील. निर्मात्यांनी 19 जानेवारीपासून या चित्रपटाच्या टेस्ट शूटिंगला सुरुवात केली होती. चित्रपटाचे टेस्ट शूटिंग बंद स्टुडिओमध्ये केले जात होते, जेणेकरून प्रत्यक्ष शूटिंगपूर्वी संपूर्ण प्रॅक्टिस करता येईल.

350 ते 400 कोटींच्या मेगा बजेटमध्ये बनणार आहे चित्रपट
थ्रीडी फॉर्मॅटमध्ये बनत असलेला हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होईल. ओम राऊत यांच्याशिवाय भूषण कुमार, प्रसाद सुतार आणि राजेश नायर हेदेखील या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. बातमीनुसार हा चित्रपट 350 ते 400 कोटींच्या मेगा बजेटमध्ये बनविला जाईल.

बातम्या आणखी आहेत...